Last Updated: Saturday, August 10, 2013, 21:19
www.24taas.com, झी मीडिया, शिर्डीशिर्डीत सिरीअल किलरला गजाआड केल्यानंतर राहाता न्यायालयान त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सूनावलीय....कोठडीत पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच आरोपीन गुन्हा केल्याची कबूली देताना आपल खरं नाव राहण्याच ठिकाण तसच हत्या करण्यामागच कारणही स्पष्ट केलय...सचिन रामदास वैष्णव अस या आरोपीच नाव असून तो मुळचा औरंगाबाद जिल्हयातील दौलताबाद येथे राहणारा आहे...सचिन
अहमदनगर पोलिसांनी या सचिन वैष्णवला अटक करुन सुटकेचा निश्वास टाकलाय..सीरियल किलर म्हणून पोलिसांच्या नाकी नऊ आणना-या या सचिननं शिर्डीमध्ये दहशत पसरवली होती..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शिर्डीत ८ जूलै रोजी साईनगर रेल्वे स्थानकाच्या फलाटावर दोन भिका-यांची हत्या करण्यात आली होती त्यानंतर २७ जूलै रोजी साईप्रसादालयाजवळ एका भिका-याचा तर २८ जूलै रोजी ३ भिकां-यांचे मृतदेह आढळून आल्याने शिर्डीत एकच खळबळ उडाली होती.....यात दोन भिकारी खूनी हल्यातून बचावले होते....८ जूलै रोजी झालेल्या हत्येचा थरार रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्हीत कैद झाला होता त्या फूटेजवरून पोलिसांनी संशियताचं रेखाचित्र तयार केल होतं. त्यावेळी एका संशियताला ताब्यात घेऊन शिर्डी पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. मात्र रेल्वे पोलिसांनी त्याला साधी चौकशी करून सोडून दिल होतं....या घटनेनंतर काही दिवसातच चार भिका-यांची हत्या झाल्यानंतर शिर्डी पोलिसांनी सचिनला पून्हा ताब्यात घेतलं.पोलिसांनी आरोपी सचिनचा कसून तपास केला असता त्यानं केलेल्या गुन्ह्याची कबूली दिलीय.
पुण्यात केटरींगच्या मजूरीचं काम करत होता.. त्या दरम्यान कामावरून घरी जाताना काही भिका-यांनी त्याच्या जवळचे पैसे हिसकावून मारहाण केली होती..आणि त्याचाच त्याला राग होता...त्यामुळे त्यानं भिका-यांना टार्गेट केलं होतं.
भिकारी झोपेत असताना डोक्यात दगड घालून निर्घूणपणे खून करण्याची त्याची पद्धत होती.. आरोपीच्या या खून करण्याच्या पद्धतीमुळे राज्यातील पोलिस यंत्रणेपूढे अशा सिरीअल किलरला पकडनं मोठं आव्हान होतं.अखेर पोलिसांनी आरोपीला अटक करुन सुटकेचा निश्वास टाकलाय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, August 10, 2013, 21:19