अमिताभ, माधुरीच कशाला हवेत?- अमोल पालेकर Amol Palekar has objection on Amitabh & Madhuri

अमिताभ, माधुरीच कशाला हवेत?- अमोल पालेकर

अमिताभ, माधुरीच कशाला हवेत?- अमोल पालेकर
www.24taas.com, सांगली

बारामतीत होणाऱ्या नाट्यसंमेलनात अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित हे प्रमुख पाहुणे म्हणून कशाला हवेत, असा सवाल केलाय ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी.

प्रेक्षकांची गर्दी खेचण्यासाठी चंदेरी दुनियेतील झगमगीत आकर्षणांचा हट्ट नको, असं मतही त्यांनी व्यक्त केलंय. सांगलीत विष्णूदास भावे पुरस्कारप्रसंगी ते बोलत होते. माधुरी दीक्षित मराठी असूनही तिने ना कधी मराठी नाटकाशी संबंध ठेवला ना मराठी सिनेमांशी. असं असतानाही तिला नाट्यसंमेलनात बोलवण्याचं कारण काय? असा प्रश्न पालेकरांनी उपस्थित केला.

मराठी नाट्यक्षेत्राचा मानाचा समजला जाणारा विष्णूदास भावे पुरस्कार अमोल पालेकर यांना सांगलीत प्रदान करण्यात आला.

First Published: Monday, November 5, 2012, 23:23


comments powered by Disqus