Last Updated: Wednesday, January 11, 2012, 22:56
www.24taas.com, पुणे प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले आता अभिनयाची शाळा भरवणार आहे. प्रशांत दामले फाऊंडेशन आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमानं पुण्यामध्ये टी-स्कूलची स्थापना करण्यात आली आहे.
या शाळेत अभिनयाचं पायाभूत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते या संस्थेचं उदघाटन करण्यात आलं. यावेळी नाट्य तसंच सिनेक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
चार महिन्यांच्या दैनंदिन कोर्सच्या माध्यमातून या शाळेत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. स्वत: प्रशांत दामले यांच्यासह अभिनय आणि कला क्षेत्रातील इतर नामवंत याठिकाणी कलाकार घडवण्याचं काम करणार आहेत.
First Published: Wednesday, January 11, 2012, 22:56