प्रशांत दामलेंकडून नाशिक पालिकेच्या कारभाराचे वाभाडे

Last Updated: Friday, February 21, 2014, 20:20

प्रशांत दामलेंचा नाशिकमध्ये प्राध्यापक वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मात्र या जाहीर कार्यक्रमात प्रशांत दामले यांनी नाशिक महापालिकेच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले.

चार दिवसांत १ लाख नेत्रदानाचा संकल्प

Last Updated: Friday, November 22, 2013, 18:39

झी २४ तास, सदगुरू मंगेशदा क्रियायोग फाऊंडेशन आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्यावतीनं सुरु असलेल्या नेत्रदान उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळतोय. अवघ्या चार दिवसांत १ लाख लोकांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे.

संकल्प करुया नेत्रदानाचा!

Last Updated: Wednesday, November 20, 2013, 07:45

`झी २४ तास`, सद्गुरू मंगेशदा क्रिया फाउंडेशन आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्यावतीन एक स्तुत्य आणि कल्याणकारी असा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आलाय. हा उपक्रम आहे नेत्रदानाचा...

प्रशांत कुटुंबासहीत नेत्रदान मोहिमेत सहभागी!

Last Updated: Saturday, November 9, 2013, 14:43

प्रशांत दामले फॅन फाउंडेशन निर्मीत `नकळत दिसले सारे` या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात संपन्न झाला.

‘नकळत दिसले सारे…’ प्रशांत दामलेंचं नवं नाटक

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 08:44

अभिनेता प्रशांत दामले लवकरच एक नवीन नाटक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतायेत ‘नकळत दिसले सारे…’ दृष्टीहिनांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणारं हे नाटक आहे. विशेष म्हणजे शुभारंभाच्या प्रयोगाच्या दिवशी स्वतः प्रशांत दामले एक नवा संकल्प करणार आहेत.

प्रशांत दामले यांना हृदयविकाराचा झटका

Last Updated: Saturday, May 11, 2013, 11:26

मराठी अभिनेते प्रशांत दामले यांना शुक्रवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. डॉक्टरांनी मात्र प्रशांत दामले यांची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलंय. पण, या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना मात्र प्रचंड धक्का बसला होता.

प्रशांत सादर करतोय विश्वविक्रमी प्रयोग!

Last Updated: Saturday, January 5, 2013, 10:01

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या आणि अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करणारा प्रशांत आज विश्वविक्रमी प्रयोग सादर करणार आहे.

प्रशांत -कविताची धमाल जोडी ९ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर

Last Updated: Saturday, October 13, 2012, 21:09

प्रशांत दामले आणि कविता लाड ही जोडी ९ वर्षानंतर रंगभूमीवर एकत्र येतेय. प्रशांत दामले आणि कविता लाड यांची ही धम्माल कॉमेडी पुन्हा एकदा रंगमंचावर आपल्याला अनुभवता येणार आहे. ‘माझिया भावोजींना रित कळेना’ या नाटकातून रंगमंचावर सुपरहिट ठरलेली ही जोडी जवळपास ९ वर्षानंतर पुन्हा एकत्र येतेय.

प्रशांत दामले शिकवणार अभिनय

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 22:56

प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले आता अभिनयाची शाळा भरवणार आहे. प्रशांत दामले फाऊंडेशन आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमानं पुण्यामध्ये टी-स्कूलची स्थापना करण्यात आली आहे.