Last Updated: Sunday, October 27, 2013, 09:26
www.24taas.com, झी मीडिया, विरारविरारमध्ये आज तिसऱ्या वसई-विरार मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरूवात झालीय. जवळपास दहा हजार धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेत. ४२ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन, २१ किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन अशा दोन गटांमध्ये ही मॅरेथॉन होतेय.
इलाम सिंग, अरविंद कुमार यादव, संतोन सिंग, के.सी.रामू असे इंटरनॅशनल धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेत. पूर्ण मॅरेथॉन विजेत्यास २ लाख आणि अर्ध मॅरेथॉन विजेत्यास १ लाख असं बक्षीस जाहीर करण्यात आलं असून पहिल्या १०मध्ये आलेल्या धावपटूंनाही बक्षीसं देण्यात येणार आहेत.
अभिनेता मिलिंद सोमण हा यावर्षी मॅरेथॉनचा `फेस ऑफ द ईअर` असणार आहेत. धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सेलिब्रेटींनी विरारमध्ये हजेरी लावलीये.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, October 27, 2013, 09:26