यंदाही मुंबई मॅरेथॉनवर केनियन धावपटूंचं वर्चस्व

Last Updated: Sunday, January 19, 2014, 15:29

‘रन मुंबई रन’चा नारा देत मुंबई मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली. लहानग्यांपासून तर अगदी ७० वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी मॅरेथॉनमध्ये उत्साहात सहभाग घेतला. मुंबईकर मोठ्या जोशात आणि जल्लोषात मॅरेथॉनमध्ये धावताना दिसले.

सचिनच्या साराची सामाजिक बांधिलकी!

Last Updated: Sunday, January 19, 2014, 09:33

सचिन तेंडुलकरची सासू आणि अपनालया या सामाजिक संस्थेद्वारे सामाजिक कार्य करणाऱ्या ऍनाबेल मेहता दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यात. सोबतच `मॅरेथॉनमध्ये यावर्षी पहिल्यांदाच भाग घेत असून एका सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मी धावणार आहे.` हे उद्गार आहेत सारा सचिन तेंडुलकर हिचे!

‘रन मुंबई रन’... गुलाबी थंडीत रंगतेय मुंबई मॅरेथॉन!

Last Updated: Sunday, January 19, 2014, 08:53

रन मुंबई रन चा नारा देत मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झालीय. हजारो मुंबईकरच नव्हे तर देश-विदेशातून आलेल्या धावपंटूंनी मॅरेथॉनमध्ये भाग घेतलाय.

'पुणे मॅरेथॉन'वर आफ्रिकन धावपटूंचंच वर्चस्व!

Last Updated: Sunday, December 1, 2013, 14:32

‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ आज होत आहे. ही २८ वी मॅरेथॉन आहे.

वसई-विरार मॅरेथॉनमध्ये सेलिब्रेटींची हजेरी

Last Updated: Sunday, October 27, 2013, 09:26

विरारमध्ये आज तिसऱ्या वसई-विरार मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरूवात झालीय. जवळपास दहा हजार धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेत. ४२ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन, २१ किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन अशा दोन गटांमध्ये ही मॅरेथॉन होतेय.

ठाण्याच्या मॅरेथॉनकडे सेना नगरसेवकांची पाठ

Last Updated: Sunday, August 25, 2013, 22:00

शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या २४ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेवर शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी बहिष्कार टाकल्याचे चित्र आज दिसून आलं.

ठाण्यात रंगली ‘खड्डे’मय मॅरेथॉन!

Last Updated: Sunday, August 25, 2013, 15:31

२४व्या राज्यस्तरीय ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनवर पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटचं वर्चस्व पाहायला मिळालं. पुरुषांमध्ये आलम सिंगनं १ तास, ७ मिनिटं आणि ३७ सेकंदांची वेळ नोंदवत २१ किलोमीटरमध्ये बाजी मारली. मात्र ही मॅरेथॉन खऱ्या अर्थानं रंगली ती रस्त्यावरील खड्ड्यांमुळं.

बोस्टन बॉम्बस्फोट : एक संशयित ठार, दुसरा अटकेत

Last Updated: Saturday, April 20, 2013, 16:36

बोस्टन बॉम्बस्फोट प्रकरणी अमेरिकेन पोलिसांनी एका तरुणाला अटक केलीय. बॉम्बस्फोटा दरम्यान संशयित म्हणून नजरेत आलेल्य दोन तरुणांपैकी हा एक तरुण हे. तर दुसऱ्याचा संशयित तरुणाचा पोलीस चकमकीत मृत्यू झालाय.

अमेरिकेला हादरा !

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 00:02

१२७ वर्षांची परंपरा असलेल्या बोस्टन मॅरेथॉनला लक्ष्य करण्यात आलंय.. जगातल्या सहा महत्वाच्या मॅरेथॉनपैकी एक अशी ही बोस्टन मॅरेथॉन समजली जाते..

अमेरिकेत साखळी बॉम्बस्फोट; ३ ठार १३० जखमी

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 12:54

अमेरिकेतल्या बोस्टनवासियांसाठी आजचा दिवस काळा मंगळवार ठरला आहे. शहरात आज झालेल्या ३ स्फोटात ३ जण ठार तर १३० जण जखमी झालेत.

मुंबई मॅरेथॉनमध्ये कोणी मारली बाजी?

Last Updated: Sunday, January 20, 2013, 11:24

दहव्या मुंबई मॅरेथॉनमध्ये जबरदस्त उत्साह दिसून आला. युगांडाच्या जॅक्सन केप्रोपेने पहिला तर केनियाच्या एकेझा केंबाईने दुसरे तर इथिओपियाच्या जेकब चेशरीने तिसरे स्थान पटकावले. महिलांच्या फुल मॅरेथॉनमध्ये केनियाच्या व्हेलिंटिने किपस्टरने पहिला क्रमांक मिळवला.

धैर्यासाठी मुंबईकर धावतायेत, हाफ मॅरेथॉन पूर्ण

Last Updated: Sunday, January 20, 2013, 08:09

गुलाबी थंडीत मुंबईकर धावतायत. संपूर्ण मुंबई एकत्र, एकमेकांसाठी धावतेय. एका धैर्यासाठी मुंबईकर धावतायत. कारण मुंबईची शान असलेल्या दहाव्या मॅरेथॉनला सुरुवात झालीय. पहाटे ५.४० वाजता सुरु झालेली पुरुषांची हाफ मॅरेथॉन नरेंद्र सिंगने तर महिलांची हाफ मॅरेथॉन सुधा सिंगनं जिंकलीय.

‘लाँग डिस्टन्स रनर’ हायले मुंबईत!

Last Updated: Saturday, January 19, 2013, 12:43

जगातील कोणत्याही खेळात धावण्याशिवाय पर्याय नाही, तुमच्या क्रिकेटमध्येही रन्स काढायला आणि बॉल अडवण्यासाठी धावणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणूनच प्रत्येकानं धावलंच पाहिजे, असा संदेश भारतात पहिल्यांदाच आलेला आंतरराष्ट्रीय धावपटू ‘हायले गेब्रेसेलासी’नं दिलाय.

पुणे मॅरेथॉनवर केनियाचे वर्चस्व

Last Updated: Sunday, December 2, 2012, 14:17

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनवर केनियाच्या धावपटूंनी आपले वर्चस्व राखले आहे. महिलांच्या अर्धमॅरेथॉनमध्येही केनियाच्या लुका किपकेमोई चेलिमो या महिला धावपटूने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

कविता राऊतने वसई-विरार मॅरेथॉनमध्ये मारली बाजी

Last Updated: Sunday, October 14, 2012, 11:30

वसई-विरार महापौर मॅरेथॉनमध्ये आज स्पर्धक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. एल एम सिंगने यंदाच्या वसई-विरार मॅरोथॉनच्या जेतेपदाचा मान मिळवला.

‘ठाणे वर्षा मॅरेथॉन’ला सुरूवात

Last Updated: Sunday, August 26, 2012, 09:19

महाराष्ट्रातील नामवंत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या धावपटूंचा सहभाग असलेल्या २३व्या ठाणे महापौर ‘वर्षा मॅरेथॉन’ स्पर्धेला सुरूवात झाली आहे.

`ठाणे मॅरेथॉन` शिवसेनेचीच?

Last Updated: Saturday, August 25, 2012, 23:16

`ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन` पुन्हा राजकीय वादात अडकलीय. ही मॅरेथॉन पालिकेची नसून शिवसेनेची असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तर सर्वच पक्षाच्या नेत्यांना यात सहभागी करून घेत असल्यानं होणारा आरोप चुकीचा असल्याचा दावा महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी केलाय.

यंदा ठाणे मॅरेथॉनला वादाचा 'अडथळा'

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 14:14

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन वादाच्या भोव-यात सापडण्याची चिन्ह आहेत. मनपाच्या वतीनं दरवर्षी मॅरथॉन स्पर्धेकरिता खर्च करण्यात येतो. मात्र हा खर्च नागरी उपयोगी कामासाठी करण्यात यावा असं काँग्रेसच्या एका नगरसेवकानं म्हटलंय.

पुणे मॅरेथॉन

Last Updated: Sunday, July 8, 2012, 18:35

देशातल्या पहिल्या महिला मॅरेथॉनला उत्सफुर्त प्रतिसाद

Last Updated: Sunday, March 11, 2012, 14:15

मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सध्ये स्टे फ्री-DNA मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. देशातली ही पहिली महिला मॅरेथॉन स्पर्धा आहे.

'रन नवीमुंबई रन'

Last Updated: Sunday, February 5, 2012, 20:48

नवीमुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली नवी मुंबई महापौर मॅरेथॉन आज पार पडली. 'रन नवीमुंबई रन' या नावाने पामबीचवर ही स्पर्धा पार पडली.

मुंबई मॅरेथॉन उत्साहात संपन्न

Last Updated: Sunday, January 15, 2012, 16:13

मुंबई मॅरेथॉनममध्ये केनियन धावपटूंचवं वर्चस्व दिसून आलं. केनियाच्या लबान मोईबेननं नववी मुंबई मॅरेथॉन जिंकली. त्यानं 2 तास 10 मिनिटं आणि 48 सेकंदांची वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. तर इथिओपियाच्या राजी असाफानही 2 तास 10 मिनिटं आणि 48 सेकंदांची वेळ नोदंवली. मात्र, काही सेंकंदांच्या फरकानं मोईबेननं बाजी मारली.

ड्रीम रनला सुरवात

Last Updated: Sunday, January 15, 2012, 09:27

मुंबई मॅरेथॉनचं प्रमुख आकर्षण असलेल्या ड्रीम रनला प्रचंड गर्दीत आणि उत्साहात सुरवात झाली. पेरिझाद झोराबियन, प्रतिक बब्बर, चित्रांगदा सिंग, निरंजन हिरानंदानी यांसह अनेक सेलिब्रिटीज सहभागी झाले आहेत. यामुळे मुंबई मॅरेथॉनला ग्लॅमरचं वलय प्राप्त होतं.

रन मुंबई रन

Last Updated: Sunday, January 15, 2012, 09:27

मुंबई नववी मॅरेथॉन २०१२ स्पर्धेला धडाक्यात सुरवात झाली. सकाळी ७.२५ मिनिटांनी ४२ किलोमिटरच्या फुल मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी प्रारंभ झाला

रन मुंबई, रन !

Last Updated: Saturday, January 14, 2012, 19:30

यावर्षी एकूण ३८ हजार ७७५ स्पर्धक मॅराथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. यात ४२ किलोमीटर अंतराच्या मुख्य मॅरेथॉनमध्ये २७०८ प्लेअर्स भाग घेणार असून यात २३३ परदेशी प्लेअर्सचा समावेश आहेत.

पुणे मॅरेथॉनवर इथिओपिया, केनियाची बाजी`

Last Updated: Sunday, December 4, 2011, 11:41

पुण्यातील २६व्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत इथिओपियाच्या टेफेरी रेगासा याने पहिला क्रमांक पटकावला. तर केनियाच्या फिलेमोन रोटीच याने दुसरा क्रमांक आणि इथोपियाच्याच नेगाश अबेबे याने दोन सेकंदाच्या फरकाने तिसरा क्रमांक पटकावला.

पुणं धावलं... कलमाडीविना....

Last Updated: Sunday, December 4, 2011, 06:12

आज पुणे मॅरेथॉनला अत्यंत उत्साहात सुरुवात झाली. वनमंत्री पतंगराव कदम यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. पुणे मॅरेथॉनचे हे ५६वं वर्ष आहे. महत्वाचं म्हणजे मॅरेथॉनच्या इतिहासात प्रथमच या मॅरेथॉनचे जनक सुरेश कलमाडी यांच्या अनुपस्थितीत ही मॅरेथॉन पार पडते आहे.

पुणे मॅरेथॉन ट्रस्ट हिशोब द्या हिशोब....

Last Updated: Wednesday, November 30, 2011, 15:22

पुणे मॅरेथॉनसाठी महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या निधीचा मुद्दा पुन्हा गाजण्याची चिन्हं आहेत. यंदाच्या मॅरेथॉनसाठी पुणे महापालिकेनं २५ लाखांचा निधी जाहीर केला.