Last Updated: Friday, December 13, 2013, 12:56
www.24taas.com, झी मीडिया, सेंच्युरियन वन डे मालिकेत सपाटून मार खाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या वन डे टीमचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्सचा आत्मविश्वास आकाशात गेला आहे. टीम इंडियासाठी कसोटी मालिकाही सोपी नसेल, असा खणखणीत इशारा त्याने दिला आहे.
वन डे मालिकेत टीम इंडियाला लोळवल्यानंतर आता कसोटीमध्ये त्याची पुनरावृत्ती करणार असल्याचा निर्धार डिव्हिलिअर्सने केला आहे.
आम्ही वन डेतील नंबर वन टीमविरुद्ध खेळलो. त्यांना हरवण्यासाठी आम्ही आमच्या घरच्या मैदानाचा फायदा उठवला. आमच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान वाटतो. पण कसोटी मालिकेत आम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल. भारताला ही मालिका सोपी जाणार नाही, असे डिव्हिलिअर्सने म्हटले आहे.
भारत आणि आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना १८ ते २२ डिसेंबर, तर दुसरा कसोटी सामना २६ ते ३० डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, December 13, 2013, 12:56