Last Updated: Sunday, March 2, 2014, 18:22
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली अमेरिकेतील डब्लूडब्लूएफ रेस्लिंगचा सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडू `द ग्रेट खली`ल लग्नानंतर तब्बल १२ वर्षांनी पिता बनला आहे.
ग्रेट खलीचा विवाह जालंधरमध्ये राहणारी हरविंद्र कौर राणाबरोबर मार्च २००२ मध्ये झाला होता. लग्नाच्या बारा वर्षांनंतर खलीच्या घरी पाळणा हललाय. खलीच्या घरी एका चिमुकलीचा प्रवेश झालाय.
खलीचं हिमाचल प्रदेशामधील गाव तर हा आनंद जल्लोषात साजरं करत आहे. खलीने न्यूयॉर्कमधून आई-वडिलांना फोन करुन मुलगी झाल्याची आनंदाची बातमी दिली.
न्यूयॉर्कमधील घरी बुधवारी सकाळी मुलीचा जन्म झाला आहे. नातेवाईकांनी आणि चाहत्यांनी फोनवरुन खलीवर अभिनंदनाचा वर्षाव केलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, March 2, 2014, 16:05