खेलरत्न पुरस्कारावर अंजली भागवतचा गौप्यस्फोट, Anjali Bhagwat vs krishna Poonia

खेलरत्न पुरस्कारावर अंजली भागवतचा गौप्यस्फोट

खेलरत्न पुरस्कारावर अंजली भागवतचा गौप्यस्फोट
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

खेलरत्न पुरस्काराबाबत पुरस्कार निवड समितीची सदस्य आणि शुटर अंजली भागवतनं गौप्यस्फोट केला आहे. पुरस्कार जाहीर होण्याच्या एक दिवस आधी कृष्णा पुनियाने आपल्याला फोन करून हा पुरस्कार आपल्याला मिळावा यासाठी शिफारस करण्याची विनंती केली होती, असा गौप्यस्फोट पुरस्कार निवड समितीची सदस्य अंजली भागवतनं केला आहे.

अंजलीने उघड केलेल्या या माहितीमुळे या पुरस्कारासाठी दावा करणा-या पुनियाच्या विश्वासार्हतेबद्दलच शंका निर्माण झाली आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर हा पुरस्कार आपल्याला मिळायला हवा होता, अशी मागणी डिस्कस थ्रोअर कृष्णा पुनिया आणि अपंग खेळाडू गिरिशानं केली होती.

यासंदर्भात निवड समितीतील एक सदस्य असलेल्या अंजली भागवतनं समितीच्या बैठकीला उशिरा येत त्या यादीत रोंजन सोढीचे नाव टाकले. आणि त्यामुळे हा पुरस्कार मिळविण्याची आपली संधी हुकली असल्याचं पुनियानं म्हटलं होतं. अंजलीने मात्र हा दावा खोडून काढताना म्हटले आहे की, मी यादी बदलली असं जाहीरपणे बोलणे पुनियाला शोभत नाही.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, August 22, 2013, 15:26


comments powered by Disqus