सायनावर `ज्वाला`मुखी! IBL: Jwala slams Saina for her comments on Hidayat

सायनावर `ज्वाला`मुखी!

सायनावर `ज्वाला`मुखी!
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

इंडियन बॅडमिंटन लीग आणि लिलावासंदर्भात आणखी एक वाद निर्माण झालाय. सायनानं परदेशी बॅडमिंटनपटू तौफिक हिदायतसंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी ज्वाला गुट्टानं सायनावर टीकास्त्र सोडलंय.

सायना नेहवालनं इंडोनेशियाच्या तौफिक हिदायतनं लिलावाबाबत केलेल्या वक्तव्यावर तोंडसुख घेतल्याच्या पार्श्वभूमीवर बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानं सायनावर टीका केलीय. ज्वालानं ट्विटरवरून सायनावर शाब्दिक टीका केलीय.

हैदराबाद हॉटशॉट्सकडून खेळणाऱ्या इंडोनेशियाच्या तौफिक हियायतनही आयबीएलच्या लिलावावर नाराजी दर्शवली होती. आयबीएलमध्ये बॅडमिंटनपटूंना खरेदी करताना परदेशी बॅडमिंटनपटूंना वाईट वागणूक दिली जात आहे. याच कारणास्तव यंदाची ही आपली पहिली आणि शेवटची आयबीएल असेल, असं हिदायतनं म्हटलं होतं. त्याच्या या वक्तव्यावर भारताची फुलराणी अर्थातच सायना नेहवालनं हिदायतवर टीका केली होती.

जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये अव्वल असलेल्या ली चोंग वेईला सर्वाधिक रक्कम मिळाली आहे. तौफिक हिदायत आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्त झालाय. त्याला आता बडी रक्कम कशी मिळेल? ही बाब त्यानं खिलाडू वृत्तीनं स्वीकारायला हवी, अशा शब्दात सायनानं हिदायतला ऐकवलं होतं.


त्यावर आता ज्वाला गुट्टानं उत्तर दिलंय. तिनं फुलराणीवर टीका केलीय. एका वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूबद्दल तू बोलू नकोस, असा सल्ला ज्वालानं सायनाला दिलाय.

एकूणच काय तर आयपीएलच्या धर्तीवर आयबीएलची धुमधडाक्यात सुरुवात तर झाली. मात्र मैदानावरील घडामोडींपेक्षा मैदानाबाहेरील घडमोडींसाठीच ही लीग सध्या अधिक चर्चेत राहिल्याचं दिसून येतंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, August 22, 2013, 10:44


comments powered by Disqus