शारापोव्हा ऑस्ट्रेलिया ओपनच्या सेमीफायनलमध्ये..., Australian Open 2013: Maria Sharapova marches into semi-final

शारापोव्हा ऑस्ट्रेलिया ओपनच्या सेमीफायनलमध्ये...

शारापोव्हा ऑस्ट्रेलिया ओपनच्या सेमीफायनलमध्ये...
www.24taas.com, मेलबर्न

रशियन ग्लॅमरगर्ले मारिया शारापोव्हानं ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल गाठलीय. यासोबतच तिनं एका आगळ्या वेगळ्या विक्रमाची नोंद केलीय.

क्वार्टर फायनलमध्ये तिने रशियाच्याच एकेटरिना माकारोव्हाचा १ तास ६ मिनिटे चाललेल्या मॅचमध्ये ६-२, ६-२ अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये शारापोव्हाने केवळ ९ गेम गमावत सेमी गाठण्याचा विक्रम केला. याआधी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मोनिका सेलेसनं १२ गेम गमावत सेमी गाठली होती.

दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपदाचं स्वप्न पाहणाऱ्या सेकंड सीडेड शारापोव्हाने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या दोन्ही मॅचेस डबल बॅगल म्हणजे अर्थात एकही सेट न गमावता ६-०, ६-० ने जिंकल्या होत्या तर तिसऱ्या राऊंडमध्ये व्हिनसला ६-१, ६-३ ने पराभवाची चव चाखायला लावली. क्वार्टर फायनलमध्येही शारापोव्हाने किर्सटन फ्लिपकेन्सविरूद्ध ६-१, ६-० ने सोप्या विजयाची नोंद केली होती.

आता सेमीफायनलमध्ये शारापोव्हासमोर आव्हान असणार आहे २०११ ऑस्ट्रेलियन ओपनची उपविजेती ठरलेली चिनी प्लेअर ली नाचे हिचं...

First Published: Wednesday, January 23, 2013, 09:35


comments powered by Disqus