रॉजर फेडररला झाली दुसऱ्यांदा जुळी मुलं!

Last Updated: Thursday, May 8, 2014, 10:31

टेनिसपटू रॉजर फेडरर दुसऱ्यांदा जुळ्या मुलांचा पिता झालाय. त्याची पत्नी मिर्का हिनं दुसऱ्यांदा जुळ्यांना जन्म दिला. दोन्ही मुलं असून त्यांची नावं लिओ आणि लेनी अशी आहेत. चार वर्षांपूर्वी मिर्काला मायला रोझा आणि चार्लीन रिव्हा या जुळ्या मुली झाल्या. फेडररनं ‘ट्‌वीटर`द्वारं ही ‘गुड न्यूज` दिली.

‘ऑस्ट्रेलियन ओपन’च्या घमासानाला सुरुवात

Last Updated: Monday, January 13, 2014, 08:57

ऑस्ट्रेलियन ओपन या वर्षातल्या पहिल्या ग्रॅँड स्लॅम स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. मेलबर्नच्या हार्डकोर्टावर होणाऱ्या या स्पर्धेत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचं आणि अग्रमानांकीत राफेल नदाल यांच्यात वर्चस्वाची लढाई रंगणार आहे.

महेश भूपती करणार टेनिसला अलविदा!

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 14:45

सरतं टेनिस सिझन भारतीय टेनिस स्टार महेश भूपतीकरता तिसकसं चांगलं गेलं नाही. वाढता बिझनेस आणि मुलीला पुरेसा वेळ देण्याकरता भूपती पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय टेनिस करिअरला अलविदा करणार आहे.

US ओपन : राफेल नदाल अजिंक्य, जोकोवीचचा केला पराभव

Last Updated: Tuesday, September 10, 2013, 12:13

वर्षातील अखेरच्या ग्रँड स्लॅम अमेरिकन टेनिस स्पर्धेत स्पेनच्या द्वितीय मानांकीत राफाएल नादालनं सर्बियाच्या अग्रमानांकीत नोवाक जोकोवीचचा पराभव केला. नदालनं जोकोविचचा ६-२, ३-६,६-४, ६-१ असा चार सेटमध्ये पराभव करत २०१३ च्या US ओपन ट्रॉफिवर आपलं नाव थाटात कोरलंय.

अमेरिका ओपन : सेरेना-अझारेंकामध्ये फायनलची टशन

Last Updated: Saturday, September 7, 2013, 19:21

अव्वल सीडेड आणि डिफेंडिंग चॅम्पियन सेरेना विलियम्स आणि वर्ल्ड नंबर टू विक्टोरिया अझारेंका यांच्यामध्ये यंदाची यूएस ओपनची फायनल रंगणार आहे.

अमेरिकन ओपन : लिअँडर पेस उपान्त्य फेरीत दाखल

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 12:02

भारताचा टेनिसपटू लिअँडर पेसन यानं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरूष दुहेरीत चेक प्रजासत्ताकचा टेनिसपटू राडेक स्टेपनाक याच्या साथीने उपांत्य फेरीत प्रवेश केलाय.

विम्बल्डन चॅम्पियन : अॅन्डी मरे

Last Updated: Monday, July 8, 2013, 08:05

अॅन्डी मरेने वर्ल्ड चॅम्पियन नोवाक जोकोविचचा पराभव करून पहिल्या वहिल्या विम्बल्डन जेतेपदाला गवसणी घातली.

शारापोव्हा ऑस्ट्रेलिया ओपनच्या सेमीफायनलमध्ये...

Last Updated: Wednesday, January 23, 2013, 09:35

रशियन ग्लॅमरगर्ले मारिया शारापोव्हानं ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल गाठलीय. यासोबतच तिनं एका आगळ्या वेगळ्या विक्रमाची नोंद केलीय.

राफाएल नादाल फ्रेंच ओपनचा विजेता

Last Updated: Monday, June 11, 2012, 20:08

क्‍ले कोर्टाचा सम्राट स्‍पेनचा राफाएल नादाल फ्रेंच ओपनचा विजेता ठरला आहे. नादालने फायनलमध्ये जोकोविचचा केला केला. नादालने सातव्‍यांदा फ्रेंच ओपन टेनिसचे विजेतेपद पटकाविले.