Last Updated: Thursday, April 18, 2013, 19:54
www.24taas.com, मुंबईवर्ल्ड कपमध्ये सुवर्णवेध घेणारी नेमबाज राही सरनौबतला `झी 24 तास`च्या पाठपुराव्यामुळे सरकारने 1 कोटींचे बक्षीस जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषेदत याची घोषणा केली.
दक्षिण कोरियात नुकत्याच झालेल्या शूटिंग वर्ल्ड कपमध्ये राहिने २५ मीटर स्पोर्टस पिस्टलमध्ये गोल्ड मेडलला गवसणी घातली होती. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय शूटर ठरली.
तिच्या या यशानंतर वर्ल्ड कप जिंकणा-या कबड्डीपटूंप्रमाणे मराठमोळ्या राहीलाही 1 कोटी मिळणार का? असा मुद्दा `झी 24 तास`ने उपस्थित केला होता. या वृत्ताची दखल घेत सरकारने अल्पावधीतच राहीलाही 1 कोटींचे बक्षीस जाहीर केलय.
First Published: Thursday, April 18, 2013, 19:54