फूटबॉल वर्ल्डकपच्या भविष्यवाणीसाठी `पांडा` तयार! baby pandas to predict world cup games as chinas

फूटबॉल वर्ल्डकपच्या भविष्यवाणीसाठी `पांडा` तयार!

फूटबॉल वर्ल्डकपच्या भविष्यवाणीसाठी `पांडा` तयार!
www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग

चीनमध्ये विश्वकपच्या मॅचचे रिझल्ट अगोदरच माहित पडणार आहेत... नाही नाही... हे मॅच फिक्सिंगचं प्रकरण नाही बरं का… तर, फूटबॉल वर्ल्डकपच्या निकालांच्या भविष्यवाणीसाठी पांडाच्या मुलांचा उपयोग केला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फूटबॉलचा भविष्यवक्ता ‘पॉल द ऑक्टोपस’च्या निधनानंतर आता चीनचे लोक पांडाकडून भविष्यवाणी वदवून घेणार आहेत. प्रसारित झालेल्या बातम्यांनुसार, पांडा एका टोपल्यातून आपल्या पसंतीचं खाणं निवडून आणि झाडांवर चढून मॅचच्या विजेत्या टीमबद्दल भविष्यवाणी करणार आहे.

पांडा खाण्यासाठी काय निवडतो यावर मॅचमध्ये विजय, पराभव किंवा ड्रॉ होईल याबद्दल भविष्यवाणी केली जाईल. नॉकआऊट राऊंडच्या निकालांसाठी पांडा झाडावर लावण्यात आलेल्या झेंड्यांमधून ज्या टीमच्या झेंड्यांना निवडेन त्या टीमला विजेती टीम म्हणून घोषित करण्यात येईल. जर्मनीच्या पॉल ऑक्टोपसनं 2010 वर्ल्डकपमध्ये अनेक निकालांची अचूक अशी भविष्यवाणी केली होती.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 4, 2014, 08:28


comments powered by Disqus