जागतिक कुस्ती स्पर्धेत बजरंगची कांस्य पदकाची कमाई Bajrang wins bronze medal in World Wrestling championship

जागतिक कुस्ती स्पर्धेत बजरंगची कांस्य पदकाची कमाई

जागतिक कुस्ती स्पर्धेत बजरंगची कांस्य पदकाची कमाई
www.24taas.com , झी मीडिया, बुडापेस्ट

जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंचा दबदबा पहायला मिळतोय. अमित कुमारपाठोपाठ भारतीय कुस्तीपटू बजरंगनंही कांस्य पदकाची कमाई केली आहे. बजरंगनं ६० किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं. त्यामुळं जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय मल्लांनी दोन पदकांची कमाई केलीय.

बजरंगनं मंगोलियाच्या नयाम ओचीरला ९-२ असं हरवलं. ओचीरनं सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र २० वर्षीय बजरंगनं अल्पावधीतच ओचीरच्या आक्रमकतेला वेसन घातली आणि कांस्यपदकाची कमाई केली.

याआधी योगेश्वर दत्तचा पर्याय म्हणून टीममध्ये सहभागी झालेल्या बजरंगला पहिल्या फेरीमध्ये बाय मिळाला. मात्र दुसऱ्या फेरीत त्यानं बुल्गारियाचे व्लादिमिरोब डुबोबच्या हाकून त्याला ०-७नं पराभव स्विकारावा लागला. डुबोव फायनलमध्ये पोहोचल्यानंतर बजरंगला कांस्य पदकासाठी लढण्याची संधी मिळाली आणि त्यानं संधीचं सोनं करत पदक कमावलं.

यापूर्वी कालच अमित कुमारनं भारताला रौप्य पदक मिळवून दिलं होतं.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, September 18, 2013, 08:42


comments powered by Disqus