Last Updated: Thursday, February 14, 2013, 14:54
www.24taas.com, जोहान्सबर्ग जगभरात ‘व्हॅलेंटाईन डे’ मोठ्या उत्साहानं साजरा होत असतानाच दक्षिण आफ्रिकेचा पॅराऑलिम्पक धावपटू आणि स्टार खेळाडू ऑस्कर पिस्टोरिअस यानं आपल्या मैत्रिणीचा खून केलाय. पोलिसांनी पिस्टोरिअसला अटक केलीय.
‘व्हॅलेंटाईन सरप्राईज’ देण्याच्या नादात पिस्टोरिअसच्या मैत्रिणीला आपला जीव गमवावा लागल्याचा दावा स्थानिक वृत्तपत्रांनी केलाय. ‘व्हॅलेंटाईन सरप्राईज’ देण्याच्या प्रयत्नात असलेल्या मैत्रिणीला चोर समजून ऑस्करनं त्याच्या घरातच गोळ्या घातल्या. यामध्ये तिच्या डोक्याला आणि हाताला छेदून गेलेल्या गोळीनं तिचा जीव घेतला... ऑस्कर पिस्टोरिअसनं हा खून जाणूनबुजून नाही तर अजानतेपणी केलाय, असा दावा स्थानिक मीडियानं केलाय. पोलिसांना ऑस्करच्या घरातच त्याच्या मैत्रिणीचा मृतदेह मिळालाय. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
जेमतेम पंचविशीचा ऑस्कर ’ब्लेडरनर’ या नावानं ओळखला जातो. ’पाय नसलेला जगातला सर्वांत वेगवान मनुष्य’ असंही त्याला म्हटलं जातं, कारण कार्बन फायबरांपासून तयार केलेले कृत्रिम पाय लावून तो धावतो.
First Published: Thursday, February 14, 2013, 13:19