ऑस्कर पिस्टोरिअसला जामीन मंजूर..., Oscar Pistorius got bail

ऑस्कर पिस्टोरिअसला जामीन मंजूर...

ऑस्कर पिस्टोरिअसला जामीन मंजूर...
www.24taas.com, प्रिटोरिया

प्रेयसीच्या हत्येप्रकरणी तुरूंगात असलेला लंडन ऑलिम्पिक मेडल विजेता ऑस्कर पिस्टोरियसला जामीन मंजूर करण्यात आलाय. दक्षिण आफ्रिकेतील न्यायालयाने पिस्टोरियसला हा जामीन मंजूर केलाय.

चार दिवस या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू होती. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारी रोजी आपल्या मैत्रीणीवर गोळीबार केल्याने तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली पिस्टोरियसवर गुन्हा दाखल झालाय. पिस्टोरिअसला जामीन मिळाल्यानं आता हा खटला ४ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आलाय. पुढील सुनावणीपर्यंत कोणत्याही निषिद्ध पदार्थ किंवा अल्कोहोलचं सेवन न करण्याच्या अटीवर त्याला हा जामीन मंजूर करण्यात आलाय. या प्रकरणी दोषी आढळल्यास पिस्ट्रोरियसला जन्मठेपेचीही शिक्षा होऊ शकते.

‘मी आणि रिवा एकमेकांवर खूप प्रेम करत होतो आणि आमच्या प्रेमाचा शेवट असा होईल, असा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता’ असं पिस्टोरिअसनं कोर्टात मागच्या सुनावणी दरम्यान म्हटलं होतं.

First Published: Saturday, February 23, 2013, 10:26


comments powered by Disqus