फुटबॉल वर्ल्डकपवर ब्राझीलकर नाराज Brazilian citizens nervouse on football world cup

फुटबॉल वर्ल्डकपवर ब्राझीलकर नाराज

 फुटबॉल वर्ल्डकपवर ब्राझीलकर नाराज
www.24taas.com, झी मीडिया, रिओ दी जानोरो

अवघ्या एका महिन्यावर आलेल्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेची सगळेच फुटबॉल प्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र सध्या तेथील नागरिकांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागतंय. तसेच या समस्यांचे खापर वर्ल्डकपला होणारा ११ अब्ज डॉलरच्या खर्चावर फोडलं जातोय. याबाबतची खंत `फिफा`चे महासचिव जेरॉम वॅल्की यांनी `फिफा`च्या वेबसाइटवरुन व्यक्त केलंय.

`ब्राझीलमध्ये होणारा फिफा किंवा कन्फेडरेशन कप तसेच वर्ल्डकप सर्वात मोठी गुंतवणूक असुन, नागरिकांच्या समस्या वर्ल्डकपमुळे होत नसल्याचे` वॅल्की यांनी सांगितलं. तसेच काही आंदोलकांनी वर्ल्डकपला सामाजिक निधी वापरला जातोय, असा आरोप केला आहे. त्यामुळे स्टेडियम बांधकामामध्ये अडथळे येऊन, कामास जास्त वेळ लागतोय.

आंदोलकांचा विरोध लक्ष्यात घेऊन रिओ दी जानोरो येथील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच लाखो पोलीस आणि सुरक्षारक्षक शांतता राखण्यासाठी तैनात केले गेलेत. रिओमध्ये एकूण वर्ल्डकप स्पर्धेच्या पाच लढती होणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 14, 2014, 17:50


comments powered by Disqus