वर्ल्डकप 2104 : नेदरलँडची चिलीवर धडाकेबाज मात

Last Updated: Tuesday, June 24, 2014, 09:17

ऑरेंज आर्मीचा विजयी धडाका कायम असून त्यांनी सलग तिसऱ्या विजयाची नोंद केलीय. नेदरलँड्सने चिलीवर 2-1नं विजय मिळवत `बी`ग्रुपमधील आपल अव्वल स्थान कायम राखलंय तर दोन विजय मिळवणारी चिली दुसऱ्या स्थानी आहे.

फिफा वर्ल्डकप : पोर्तुगाल अमेरिकेचा सामना 2-2 ने ड्रॉ

Last Updated: Monday, June 23, 2014, 12:57

अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेली पोर्तुगाल-अमेरिका मॅच 2-2ने ड्रॉ झाली. अखेरच्या तीसन सेकंदांमध्ये वरेलाने गोल करत पोर्तुगालची लाज राखली.

`फिफा वर्ल्डकप`मध्ये विकेन्डच्या रंगतदार लढती...

Last Updated: Saturday, June 21, 2014, 09:31

तीन वेळा वर्ल्ड कपला गवसणी घालणाऱ्या जर्मनीचा आज घानाशी मुकाबला होणार आहे. अर्जेंटीनाला पराभूत करत विजयी सलामी दिलेल्या जर्मनीसाठी हा अतिशय सोपा मुकाबला असणार आहे तर पहिला मुकाबला गमावलेल्या घानासाठी विजय आवश्यक आहे.

फिफा 2014 : कोस्टा रिकाकडून इटली 1-0ने पराभूत

Last Updated: Saturday, June 21, 2014, 08:17

फिफा वर्ल्ड कपमध्ये स्पेनच्या पाडावानंतर इटलीलाही पराभवाच तोंड पहावं लागलं. वर्ल्ड कपमधील हा दुसरा मोठा अप सेट ठरला.

फिफा वर्ल्डकप 2014 : आज इटली X कोस्टा रिका

Last Updated: Friday, June 20, 2014, 12:27

आज इटली आणि कोस्टा रिका दरम्यान लढत रंगणार आहे. चार वेळेची वर्ल्ड चॅम्पियन इटली कोस्टा रिकाच्या तुलनेत बलाढ्य आहे

फिफा फुटबॉल : इंग्लंडचं आव्हान जवळपास संपुष्टात

Last Updated: Friday, June 20, 2014, 07:59

उरुग्वेने इंग्लंडला 2-1ने पराभूत करत इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आणलय. चार आठवड्यांपूर्वी गुडघ्यावर सर्जरी झालेल्या सुआरेझने दमदार कमबॅक करत उरुग्वेच्या नावावर पहिल्या विजयाची नोंद केली. तर रुनीने पुन्हा एकदा दोन गोल्डन चान्स गमावले.

फिफा वर्ल्डकप - स्पेनचा धक्कादायक पराभव, नेदरलँड्सची किमया

Last Updated: Thursday, June 19, 2014, 08:07

फिफा वर्ल्ड कपमध्ये वर्ल्ड चॅम्पियन स्पेनचा चिलीने धक्कादायक पराभव करत त्यांना पॅक अप करायला भाग पाडल. वर्ल्ड कपमधील हा पहिला मोठा अप सेट ठरला. चिलीने स्पेनला 2-0ने पराभूत करत स्पेनच स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात आणलं.

फिफा फुटबॉल वर्ल्डकपमधील थोडक्यात बातम्या

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 08:08

पाच वेळची वर्ल्ड चॅम्पियन टीम ब्राझिलला मेक्सिकोनं गोल शून्य बरोबरीत रोखलं. थियागो सिल्व्हाची ब्राझिलियन टीम मेक्सिकोचा डिफेन्सच भेदण्यात अपयशी ठरली.

फिफा वर्ल्डकप 2014 : पोर्तुगालची मदार रोनाल्डोवर!

Last Updated: Monday, June 16, 2014, 19:14

पोर्तुगाल आणि जर्मनीमध्ये आज हाय व्होल्टेज मॅच फुटबॉल प्रेमींना पाहायला मिळणार आहे. पोर्तुगालाचा स्टार स्ट्रायकर रोनाल्डो या मॅचमध्ये खेळणार असल्य़ानं जर्मनीची डोकेदुखी वाढली आहे.

या खेळाडूसाठी 60% भारतीय मुलींना होतेय `धकधक`

Last Updated: Monday, June 16, 2014, 13:01

सध्या सुरु असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप जगभरात गाजतोय. आपल्या आवडत्या खेळांडूना बघायला त्याचे चाहते उत्सुक असतात. त्यापैकी अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सीच्या प्रेमात चक्क 60% भारतीय मुलीं पडल्यात...मेस्सी हा भारतीय मुलींचा आवडता फुटबॉलर असल्याचे समजतेय.

फिफा वर्ल्डकप 2014 : थोडक्यात अपडेट

Last Updated: Monday, June 16, 2014, 10:50

फ्रान्सनं होंडुरासवर 3-0 नं मात करत फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार सुरुवात केली.

फिफा वर्ल्डकप : कोस्टा रिकाचा उरुग्वेवर 3-1 नं विजय

Last Updated: Sunday, June 15, 2014, 17:26

कोस्टा रिकानं उरुग्वेवर 3-1 अशा फरकानं विजय मिळवलाय. `ग्रुप डी`च्या सामन्यात 23 व्या मिनाटाला उरुग्वेचा एडिसन्स कवानीने पेनल्टी किकवर गोल केला.

‘फिफा` वर्ल्डकप 2014 मध्ये आज...

Last Updated: Sunday, June 15, 2014, 14:06

वर्ल्ड कपमध्ये स्टार स्टडेड मॅच रंगणार आहे ती इंग्लंड आणि इटलीमध्ये… वेन रूनी, स्टिव्हन जेरार्ड, मारियो बालोटेली आणि आंद्रेय पिर्लो हे चार फुटबॉलपटू या मॅचेमध्ये सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरणार आहे.

फिफा फुटबॉल कप - गतविजेत्या स्पेनचा दारुण पराभव

Last Updated: Saturday, June 14, 2014, 07:38

गतविजेत्या स्पेनचा दारुण पराभव झालाय. नेदरलॅडने ५-१ ने स्पेनचा दणदणीत पराभव केलाय. 2010 फुटबॉल वर्ल्डकप फायनलमध्ये स्पेननं नेदरलँडचा पराभव केला होता. याच पराभवाची परतफेड नेदरलँडने दणदणीत विजयाने केली.

FIFA वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये अनोखा रेकॉर्ड

Last Updated: Friday, June 13, 2014, 15:58

फिफा वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये एक अनोखा रेकॉर्ड बनलाय. या मॅचमध्ये जरी क्रोएशियाविरोधात ब्राझीलनं 3-1 अशी मॅच जिंकली. पण मॅचचे सर्व गोल ब्राझीलच्या खेळाडूंनीच केले. मॅचचा पहिला गोल क्रोएशियाच्या खात्यात गेला मात्र कोणतीही मेहनत न करता.

गूगलचं ‘डुडल’ही घेतंय फिफा वर्ल्डकपचा आनंद!

Last Updated: Thursday, June 12, 2014, 18:51

फिफा वर्ल्डकप २०१४ सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या फूटबॉल वेड्यांची प्रतिक्षा आता संपलीय. लहान- मुलांपासून मोठयापर्यत फिफा वर्ल्डकपसाठीची उत्सुकता दिसून येतेयं.

ब्राझीलमध्ये आजपासून रंगणार फुटबॉलपटूंचा महामेळा

Last Updated: Thursday, June 12, 2014, 08:37

ब्राझीलमध्ये फुटबॉलपटूंचा महामेळा रंगणार आहे. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 32 टीम्समध्ये लढत होत आहे. मोस्ट अवेटड असा फुटबॉल वर्ल्ड कप 12 जूनला कीक-स्टार्ट होणार आहे. जगभरातील 32 टीम्समध्ये फुटबॉल वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्यासाठी रेस लागणार आहे. फुटबॉलपटूंचा हा महामेळा फुटबॉलप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये कोणत्या ग्रुपमध्ये कोणत्या टीम्सचा समावेश असणार आहे. त्यावर एक नजर.

स्कूटरवरून लंडन ते ब्राझील... ऑल फॉर फूटबॉल

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 14:51

‘इंग्लंड फूटबॉल टीम’चा एका चाहत्यानं लंडन ते ब्राझील असं जवळजवळ 24,000 किलोमीटरचा प्रवास आपल्या वेस्पा स्कूटरवर बसून केलाय

सोशल मीडियावर फिफा वर्ल्ड कपच्या जाहिरातीचा धुमाकूळ

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 14:32

फिफा वर्ल्ड कप सुरू व्हायला आता केवळ दोनच दिवस उरले आहेत. त्यामुळं सगळीकडे आता फूटबॉल फिवर चढलेला दिवस. McDonald नं फिफा वर्ल्ड कपवर एक जाहिरात बनवलीय. सध्या ही जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच गाजतेय.

अपंगत्वावर मात करत `तो` मारणार पहिली किक

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 09:10

यंत्रमानवाप्रमाणं भासणाऱ्या पोलादी वेशात बहुविकलांग व्यक्ती फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात पहिली किक मारणार आहे. अर्धांगवायूच्या झटक्यानंतर व्यक्तीला त्याच्या पायावर उभं करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे

फुटबॉल वर्ल्डकपमध्ये यंदा ‘ऑक्टोपस’च्या जागा चीनी ‘पांडा’!

Last Updated: Saturday, June 7, 2014, 13:41

दक्षिण आफ्रिकेतील (२०१० साली) गत फुटबॉल वर्ल्डकपमध्ये पॉल ऑक्टोपसनं अचूक भविष्यवाणी करून अवघ्या क्रीडाविश्वाकचे लक्ष वेधून घेतलं होतं. यंदा चीनमधील पांडा ब्राझीलमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमधील सामन्यांची भविष्यवाणी करणार आहे.

एचडी कॅमेऱ्यावर पाहा `ब्राझुका`चे दण दणा दण गोल!

Last Updated: Friday, June 6, 2014, 10:16

फुटबॉल वर्ल्ड कपचा उत्साह शिगेला पोहचलाय. या वर्ल्ड कपसाठी वापरण्यात येणारा बॉल कसा असेल? याबाबतही फुटबॉलप्रेमींना उत्सुकता आहे.

फुटबॉल वर्ल्डकपवर ब्राझीलकर नाराज

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 17:50

अवघ्या एका महिन्यावर आलेल्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेची सगळेच फुटबॉल प्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र सध्या तेथील नागरिकांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागतंय. तसेच या समस्यांचे खापर वर्ल्डकपला होणारा ११ अब्ज डॉलरच्या खर्चावर फोडलं जातोय. याबाबतची खंत `फिफा`चे महासचिव जेरॉम वॅल्की यांनी `फिफा`च्या वेबसाइटवरुन व्यक्त केलंय.

शकिराच्या `ला ला ला`ने लावले वेड

Last Updated: Wednesday, March 26, 2014, 13:02

`वाका वाका` या गाण्यानंतर पॉप स्टार शकिराने पुन्हा एकदा रसिकांना वेड लावले आहे. तिच्या नव्या गाण्याने फेसबुक आणि युट्युबवर धमाल केली आहे.