ज्वाला गुट्टा भडकली, देणार प्रत्युत्तर!, Disgusting way to start Indian Badminton League: Jwala Gutta

ज्वाला गुट्टा भडकली, देणार प्रत्युत्तर!

ज्वाला गुट्टा भडकली, देणार प्रत्युत्तर!


www.24taas.com, झी मीडिया, हैदराबाद

इंडियन बॅडमिंटन लीग`ने पूर्वकल्पना न देता बेसप्राईसपेक्षा किंमत कमी केल्याचा आरोप ज्वाला गुट्टा आणि अश्विॅनी पोनप्पानं केला आहे. ज्वालानं आयबीएलच्या ज्वालानं आयोजकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. अस असलं तरी, आयबीएलमध्ये खेळणार असल्याचं ज्वाला गुट्टानं स्पष्ट केलं आहे.

ज्वाला गुट्टा... भारतीय वुमेन्स डबल्सचा चेहरा... अश्विनी पोनप्पाच्या साथीनं तिनं डबल्समध्ये भारतासाठी मेडल्सची कमाई केली. अशक्यप्राय असे विजय या दोघींनी मिळवत भारतीय बॅडमिंटनचा चेहराच बदलून टाकला. बॅडमिंटनला ग्लॅमरही ज्वालामुळेच मिळालं. मात्र, आयपीएलच्या धर्तीवर सुरु होणा-या आयबीएलमुळे अनेक वाद निर्माण झाले आहेत.

ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा ही भारतीय बॅडमिंटनमधील हिट जोडी. मात्र, या जोडीला आयबीएलमध्ये बेसप्राईसएवढी किंमतही मिळाली नाही. या दोघींनी कोणीही खेरदी करायला तयार झालं नाही. त्यामुळे आयोजकांनी त्यांची बेसप्राईसच अर्धी केली. त्यानंतर या दोन टेनिसपटूंना खेरदी करण्यात आलं. या सा-या प्रकरावर ज्वाला गुट्टानं नाराजी दर्शवली आहे. त्याचप्रमाणे आपण दु:खी झाल्याचही सांगितलं आहे.

ज्वाला गुट्टानं आयोजकांवर याबाबतीत आगपाखड केली आहे. मात्र, आयबीएलमध्ये आपण दिल्लीकडून खेळणार असल्याचं तिनं सांगितलं आहे.

ज्वाला-अश्विेनी जोडीनं 2010च्या दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल पटाकून दिलं होतं. 2011 मध्ये लंडनमधील वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये त्यांनी ब्रॉंझ मेडल पटकावले होते. सहा प्रमुख आयकॉन बॅडमिंटनपटूंमध्ये त्यांचा समावेश होता. मात्र, सोमवारी लिलावापूर्वीपर्यंतचे हे चित्र काही तास अगोदर पूर्णपणे पालटलं.

त्यानुसार त्यांची बेसप्राईस किंमत 50 हजार डॉलरवरून 25 हजार डॉलर करण्यात आली. सहा फ्रॅंचाईजींशी चर्चा करून हा निर्णय झाला. मात्र, त्याविषयी या दोघींना कल्पना देण्यात आली नाही. आणि त्यानंतरच या वादाला तोंड फुटलं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 24, 2013, 22:21


comments powered by Disqus