पाहाः म्हाडाच्या लॉटरीची पात्रता यादी

Last Updated: Friday, June 20, 2014, 19:10

म्हाडाच्या लॉटरीकडे डोळे लावून राहिलेल्या मुंबईकर आणि कोकणवासियांना आपले नाव लॉटरी प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले की नाही याची खात्री करून घेण्यासाठी म्हाडाने पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे.

जुलैनंतर सर्व नवे एटीएम बोलणारे असावेः RBI

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 21:38

येत्या २०१४ जुलैपासून सर्व नवे एटीएम मशीन बोलणारे असावेत, तसेच त्याचे ब्रेल की-पॅड उपलब्ध करण्यात यावे, असे रिझर्व बँकेने बुधवारी सर्व कमर्शिअल बँकांना निर्देश दिले आहे. सर्व एटीएम मशीनमध्ये (ऑडिबल) सूचना देणारी यंत्रणा असावी असे रिझर्व आदेश आहे.

सोशल मीडियातलं संभाव्य मंत्रिमंडळ....

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 13:57

पंतप्रधानपदासाठी ‘एनडीए’नं अधिकृतरित्या नरेंद्र मोदींचं नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केलाय. त्यामुळे, आता मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाला स्थान मिळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलीय.

सोलापूर, माढा मतदार संघात `अजब गोंधळ`

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 09:23

माढाचे महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त वक्तव्याची ऑडीओ क्लिप आर आर पाटील यांनी सांगलीत पत्रकारांना ऐकवली. तर सोलापूर लोकसभा मतदार संघातील मोहोळ विधानसभा निवडणूक अधिका-यांनं निवडणूकीच्या प्रशिक्षण शिबिरात दारु पीऊन गोंधळ घातला.

लोकसभा निवडणूक : `मनसे`चे संभाव्य उमेदवार

Last Updated: Sunday, March 9, 2014, 12:56

लोकसभा निवडणूक लढवण्याचं मनसेनं निश्चित केलंय. त्यामुळे कार्यकर्त्यांत आणि इतर पक्षांचीही उत्सुकता आता प्रचंड ताणली गेलीय.

तयारी लोकसभेची : `राष्ट्रवादी`चे संभाव्य उमेदवार

Last Updated: Tuesday, February 18, 2014, 17:06

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील लोकसभा जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू असतानाच काही महत्त्वाच्या जागांवर उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केले आहेत.

आदिवासी मोखाड्यात बांधणार हॉस्पिटल, उद्धव ठाकरेंची घोषणा

Last Updated: Sunday, October 27, 2013, 09:18

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील खोडाळा परिसराचा दौरा केलाय. या दौऱ्यात त्यांनी शिवसेनेतर्फे मोखाडा तालुक्यात सुरु असलेल्या कुपोषित बालक आणि गरोदर मातांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा आढावा घेतला. शिवाय कुपोषित बालकं त्याच्या मातांना मिठाई,साडी चोळी वाटपही केली.

खाद्यतेलाचा काळाबाजार, नऊ टँकर जप्त

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 18:20

कोल्हापूर जिल्हा पुरवठा विभागानं खाद्यतेलाचा कृत्रिम साठा करणा-या नऊ तेल टॅँकरवर कारवाई केली आहे. १ कोटी २० लाख रुपये किंमतीचे हे खाद्यतेल असून दिवाळीसाठी या खाद्य तेलाचा कृत्रिम साठा केला असण्याची शक्यता पुरवठा विभागानं व्यक्त केलीय.

ज्वालाच्या `बंड`मिंटन विरोधात आजीवन बंदीची शिफारस

Last Updated: Sunday, October 6, 2013, 09:09

भारतीय बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टावर आजीवन बंदीची कारावाई होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय बॅडमिंटन असोसिएशननं ज्वालावर आजीवन बंदीची कारवाई करावी अशी शिफारस केली आहे.

‘...तर विधेयक आणणाऱ्यांनी राजीनामा द्यावा’

Last Updated: Friday, September 27, 2013, 17:39

जर, हे विधेयक चुकीचं आहे असं राहुल गांधींन वटातंय तर हे विधेयक आणणाऱ्या सरकारमधील लोकांनी राजीनामा दिला पाहिजे, असं विरोधी पक्षाचे नेते अरुण जेटली यांनी म्हटलंय.

सायनावर `ज्वाला`मुखी!

Last Updated: Thursday, August 22, 2013, 11:09

इंडियन बॅडमिंटन लीग आणि लिलावासंदर्भात आणखी एक वाद निर्माण झालाय. सायनानं परदेशी बॅडमिंटनपटू तौफिक हिदायतसंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी ज्वाला गुट्टानं सायनावर टीकास्त्र सोडलंय.

सायनाचा विजयी धडाका!

Last Updated: Tuesday, August 20, 2013, 16:14

इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये सायना नेहवालचा विजयी धडाका कायम आहे. हैदराबाद हॉटशॉट्स विरुद्ध पुणे पिस्टन्समध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत सायनानं ज्युलियन शेंकवर मात करत रंगतदारपणे विजय मिळवला.

आता मुंबईतही ‘आयबीएल’ची धूम!

Last Updated: Monday, August 19, 2013, 14:51

इंडियन बॅडमिंटन लीगचा धमाका आता मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. आज आणि उद्या मुंबईत आयबीएलच्या लढती रंगणार आहेत. सायना नेहवाल, ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा आणि ली चाँग वेई यासारख्या दिग्गज आणि ग्लॅमरस प्लेअर्सच्या लढतींची पर्वणी मुंबईकरांनासाठी असणार आहे. विशेष म्हणजे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बॉलिवूड सेलिब्रेटीही बॅडमिंटन कोर्टवर हजेरी लावणार आहे.

सायनाची सिंधूवर मात

Last Updated: Thursday, August 15, 2013, 23:58

इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये शटलर क्वीन सायना नेहवालने विजयी सलामी दिलीय. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्राँझ मेडलला गवसणी घातलेल्या पी.व्ही.सिंधूला पराभूत करत सायनाने आपणच फुलराणी असल्याचं दाखवून दिलं.

आजपासून `आयबीएल`ची टशन सुरू!

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 09:25

इंडियन प्रीमियर लीग अर्थाच आयपीएलच्या धर्तीवर इंडियन बॅडमिंटन लीगला आजापासून उत्साहात प्रारंभ होणार आहे. सायना नेहवाल विरुद्ध पी. व्ही. सिंधू असा मुकाबलाही या टूर्नामेन्टमध्ये रंगणार आहे.

सिंधू आणि सायना येणार आमने-सामने

Last Updated: Monday, August 12, 2013, 16:37

आयपीएलच्या धर्तीवर लवकरच सुरू होणाऱ्या इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ब्राँझपदक मिळविणारी भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल आमने-सामने येण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

ज्वाला गुट्टा भडकली, देणार प्रत्युत्तर!

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 22:21

इंडियन बॅडमिंटन लीग`ने पूर्वकल्पना न देता बेसप्राईसपेक्षा किंमत कमी केल्याचा आरोप ज्वाला गुट्टा आणि अश्विॅनी पोनप्पानं केला आहे. ज्वालानं आयबीएलच्या ज्वालानं आयोजकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. अस असलं तरी, आयबीएलमध्ये खेळणार असल्याचं ज्वाला गुट्टानं स्पष्ट केलं आहे.

आयबीएल सायना नेहवालवर सर्वाधिक बोली!

Last Updated: Monday, July 22, 2013, 23:36

इंडियन बॅडमिंटन लीगसाठी आज खेळाडूंचा लीलाव झाला. हैदराबाद हॉट्सशॉट्स टीमने लंडन ऑलिम्पिक विजेती सायना नेहवालला १,२०, ००० डॉलर्समध्ये खरेदी केलं.

राज-उद्धव एकत्र येणे अशक्य- मनोहर जोशी

Last Updated: Friday, July 5, 2013, 19:26

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणं आता अशक्य अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलीय.. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर जोशी सरांनी वेगळं गणित मांडलंय...

महागाईत खाद्य तेलाचा होणार भडका

Last Updated: Tuesday, March 5, 2013, 20:24

कच्च्या खाद्य तेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तेलाच्या किमतीत वाढ होण्याचे संकेत मिळाले आहे.

`सलमान ओल्या मातीचा गोळा`

Last Updated: Thursday, December 20, 2012, 17:41

‘सलमान एक ओल्या मातीचा गोळा आहे, त्याला आपण जसा आकार देऊ तसा तो वागतो’ असं म्हणणं आहे सलमान खानचा छोटा भाऊ आणि निर्माता-अभिनेता सोहेल खानचं...

अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण?

Last Updated: Wednesday, October 3, 2012, 20:44

पुण्यात सध्या अनधिकृत बांधकामं उध्वस्त करण्याची धडक मोहीम पुणे महापालिकेनं हाती घेतलीय. मात्र या अनधिकृत बांधकामांना राजकारणी आणि महापालिकेचे अधिकारीही जबाबदार आहेत. त्यामुळे ही कारवाई करत असताना त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी नागरिक करतायत.

जल आंदोलकांना जबरदस्तीनं काढलं पाण्याबाहेर

Last Updated: Wednesday, September 12, 2012, 12:53

१७ दिवसांच्या आंदोलनानंतर खांडवातील ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देणा-या शिवराज सिंग चौहान सरकारने हरदामधील आंदोलकांवर मात्र कारवाईचे आदेश दिलेत.

नरेंद्र मोदींची स्व. इंदिरा गांधींवर टीका

Last Updated: Wednesday, June 6, 2012, 08:35

मोदी यांनी मुंबईमधल्या एका पुरस्कार सोहळ्यात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल एक घटना सांगितली. ‘पूर्वोत्तर राज्यांमध्ये जर आम्ही निवडणूक जिंकलो, तर काँग्रेस बायबलमध्ये दिलेल्या नियमांनुसार प्रशासन चालवेल, असं इंदिरा गांधींनी अश्वासन दिलं होतं.

कोण बुवा हा टॉम क्रुझ ?

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 15:58

एका वेब साईटने दिलेल्या वृत्तानुसार २०० लोकांना विमानतळावर चाहत्यांची भूमिका वठवण्याचे प्रत्येकी १५० रुपये मानधन देण्यात आलं.टॉम क्रुझचे आगमन झाल्यानंतर विमानतळावर चाहत्यांची भूमिका वठवण्यासाठी ज्युनिअर आर्टिस्टची व्यवस्था करण्याची जबाबदारी एका मॉडेल कोऑरडिनेटर सोपवण्यात आली होती. आता मजेची गोष्ट म्हणजे यापैकी अनेकांना टॉम क्रुझ कोण आहे याची काहीच कल्पना नव्हती.