`फिफा वर्ल्डकप`मध्ये विकेन्डच्या रंगतदार लढती..., Fifa world cup 2014 : germany vs ghana

`फिफा वर्ल्डकप`मध्ये विकेन्डच्या रंगतदार लढती...

`फिफा वर्ल्डकप`मध्ये विकेन्डच्या रंगतदार लढती...

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

तीन वेळा वर्ल्ड कपला गवसणी घालणाऱ्या जर्मनीचा आज घानाशी मुकाबला होणार आहे. अर्जेंटीनाला पराभूत करत विजयी सलामी दिलेल्या जर्मनीसाठी हा अतिशय सोपा मुकाबला असणार आहे तर पहिला मुकाबला गमावलेल्या घानासाठी विजय आवश्यक आहे.

माजी वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीसाठी आज सोपा पेपर आहे. मात्र, तरीही या वर्ल्ड चॅम्पियनच्या मनात एक भीती आहे. 2010 च्या वर्ल्ड कपची पुनरावृत्ती होऊ नये, अशी प्रार्थना सारे जर्मनवासी करत असतील. 2010 च्या वर्ल्ड कपमध्ये जर्मनीने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत दिमाखात सुरुवात केली होती. मात्र दुसऱ्या लढतीत सर्बियासारख्या टीमकडून 1-0 नं पराभूत होण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली होती.

या वर्ल्ड कपमध्ये जर्मनीने पोर्तुगल टीमला 4-0ने पराभूत करत वर्ल्ड कपमधील आपल्या मोहिमेला सुरुवात केलीय खरी मात्र तरीही त्यांच्या मनात एक भीतीही आहे. गेल्या वर्ल्ड कपमधील दुसऱ्या मॅचमधील पराभव आमच्यासाठी इशारा आहे. म्हणूनच आम्ही घानाविरुद्धची मॅच गांभीर्याने घेत असल्याचं जर्मनीचा डिफेंडर पेर मर्टसॅकरन सांगितलंय. पोर्तुगलविरुद्ध हॅटट्रिक करणाऱ्या थॉमस मूलरवर पुन्हा एकदा साऱ्यांच्या नजरा खिळणार आहेत. तर डिफेंडर मॅट्स हुमेल्सच्या खेळण्यावर फिटनेसमुळे साशंकता आहे.

एकीकडे जर्मनील दुखापतीं हैराण केलेल असताना घाना टीमला बंडखोरीनं ग्रासलंय. अमेरिकेविरुद्धच्या पराभवानंतर एका प्लेअरने टीमचा कोचविरुद्ध बंड पुकारल होतं. मात्र टीम मॅनेजमेंटकडून या वृत्ताच खंडन करण्यात आलंय. ईसिन हादेखील दुखापतग्रस्त असून त्यानेही काही प्रॅक्टीस सेशन केलेले नाहीत. घाना टीम बलाढ्य जरी नसली तरी 2010 च्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली होती. अशी कामगिरी करणारी घाना टीम तिसरी आफ्रिकन कंट्री ठरली होती. गेल्या वर्ल्ड कपमधील दोन्हीही टीम्सची कामगिरी पाहता आजचा मुकाबला हा गत वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीशी तुलना करतच पाहिला जाणार एवढं मात्र खरं...

एक नजर टाकूयात आजच्या लढतींवर...

रात्री 9.30वा : अर्जेंटीना Vs इराण, बेलो हॉरिझोंटे

रात्री 12.30 वा : जर्मनी Vs घाना, फोर्टेलेझा

रात्री 3.30वा : नायजेरिया Vs बोस्निया, गुईबा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 21, 2014, 09:31


comments powered by Disqus