Last Updated: Monday, May 12, 2014, 17:52
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई फॉर्म्युला 1 खेळ म्हणजे वेग, मशीन, कारवर अचूक नियंत्रण, ड्रायव्हर्सचे कौशल्य यांचा एकत्री करण आहे. मात्र सध्या फॉर्म्युला वनमध्ये प्रश्न भेडसावतोय तो आर्थिक संकटाचा.
"जर निधी कपात धोरण सादर करण्याचे निर्णय लवकर घेतले गेले नाहीत, तर फॉर्म्युला-वनमधून अनेक संघांना बाहेर पडण्याची वेळ येईल." असे, विल्यम्स संघाचे सहमालक क्लेअर विल्यम्स यांनी सांगितलंय.
तसेच प्रत्येक संघाचे फॉर्म्युला-वनमध्ये निधी कपात असली पाहिजे. याबाबतचे सर्व निर्णय शक्य असेल, तितक्या लवकर झाले पाहिजेत. याकारणाने संघ बाहेर पडणार नाहीत आणि त्याचा परिणाम खेळावर होणार नाही. असेही विल्यम्स यांनी सांगीतलं आहे.
`कार न बनविणाऱ्या संघांकडून उशीरा मानधन मिळते आणि स्वत:चा पैसा टाकणे आता शक्य नाही. त्यामुळे संघांबरोबर चर्चा करुन योग्य तो निर्णय घेऊ` असे, रेनॉचे फॉम्र्युला-वनचे अध्यक्ष यांनी सांगितले. तसेच या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन लवकरात लवकर निकाल काढावा लागेल. अन्यथा फॉम्र्युला-वन आर्थिक संकट सापडेल.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 12, 2014, 17:52