गूगलचं ‘डुडल’ही घेतंय फिफा वर्ल्डकपचा आनंद!,Google doodle celebrate FIFA worldcup Football match

गूगलचं ‘डुडल’ही घेतंय फिफा वर्ल्डकपचा आनंद!

गूगलचं ‘डुडल’ही घेतंय फिफा वर्ल्डकपचा आनंद!
www.24taas.com, झी मीडिया , साओ पावलो

फिफा वर्ल्डकप २०१४ सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या फूटबॉल वेड्यांची प्रतिक्षा आता संपलीय. लहान- मुलांपासून मोठयापर्यत फिफा वर्ल्डकपसाठीची उत्सुकता दिसून येतेयं. सर्वात जास्त प्रमाणात वापरलं जाणारं ‘गूगल’ या सर्च इंजिनलावरदेखील फिफा वर्ल्डकपचा फिव्हर चढल्याचं गूगलच्या आजच्या डूडलवरून दिसून येतंय. फूटबॉलचे चाहते गूगल डूडलच्या माध्यमातूनही फिफा वर्ल्डकपचा आनंद घेत आहेत.

आत्तापर्यत, जयंती आणि काही विशेष दिवशी गुगल डूडलच्या माध्यमांतून तो दिवस साजरा करत आलंय. पण ह्यावेळी गूगलने फिफा वर्ल्डकप २०१४ च्या सुरुवातीलाच गूगल या अक्षराला खेळांडूचे चेहरे देऊन डूडल बनवलंय.

गूगलने बनवलेल्या या डूडलमध्ये खेळाडूंसमोर एक फुटबॉल ठेवण्यात आलाय. त्या फुटबॉलला बघून सर्व खेळाडू गोल करण्याच्या तयारीत आहेत. या खेळाडूंच्या मागे एक मोठं चक्र फिरताना दिसतंय. पुढचे काही दिवस हाच ‘फुटबॉल फिव्हर’ कायम राहील असंच जणू ते सांगतंय.

प्रत्येक चार वर्षांनंतर फिफा वर्ल्डकपचे आयोजन केलं जातं. एका महिन्यापेक्षा जास्त काळ चालणारी ही स्पर्धा म्हणजे फूटबॉल चाहत्यांसाठी ‘वारी’च असते. फूटबॉल असा खेळ आहे की जो संपूर्ण जगात खेळला जातो. त्यामुळे आपल्या आवडत्या फूटबॉल स्टार्सला खेळताना पाहण्यासाठी प्रेक्षकही आतूर झालेत. युरोप, अमेरिका, मध्य पूर्व आणि लॅटीन, अमेरिकेतील देशांमध्ये तर भान हरपून हा खेळ पाहिला जातो.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 12, 2014, 18:51


comments powered by Disqus