महेश भूपती करणार टेनिसला अलविदा!Mahesh Bhupathi hints retirement next year

महेश भूपती करणार टेनिसला अलविदा!

महेश भूपती करणार टेनिसला अलविदा!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सरतं टेनिस सिझन भारतीय टेनिस स्टार महेश भूपतीकरता तिसकसं चांगलं गेलं नाही. वाढता बिझनेस आणि मुलीला पुरेसा वेळ देण्याकरता भूपती पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय टेनिस करिअरला अलविदा करणार आहे.

३९ वर्षीय महेश भूपतीनं डबल्स करिअरमध्ये १२ ग्रँड स्लॅम जेतेपदाला गवसणी घातली आहे. महेश भूपती सध्या पुढील वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय टेनिस प्रिमिअर लीगच्या तयारीमध्ये बिझी आहे. या आठवड्यात होणाऱ्या शांघाई रोलेक्स मास्टर्स टेनिस स्पर्धेतूनही भूपतीनं माघार घेतली आहे.

महेश भूपतीनं १९९७मध्ये भारताला पहिलं ग्रॅण्डस्लॅम मिळवून दिलं. लिएंडर पेससोबतच्या त्याच्या जोडीनं खूप यश मिळवलं आणि देशाला मिळवून दिलं.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 8, 2013, 14:40


comments powered by Disqus