नरसिंग यादव सलग दुस-यांदा महाराष्ट्र केसरी Narsingh Yadav becomes Mahrashtra Kesri

नरसिंग यादव सलग दुस-यांदा महाराष्ट्र केसरी

नरसिंग यादव सलग दुस-यांदा महाराष्ट्र केसरी
www.24taas.com, मुंबई

मुंबईचा कुस्तीपटू नरसिंग यादवनं सलग दुस-यांदा महाराष्ट्र केसरीची गदा पटाकवलीय. नरसिंगने विजय चौधरीला चितपट करत 56व्या महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली.

ऑलिम्पिकचा मोठा अनुभव असणा-या आणि गतविजेता असल्याने नरसिंग यादवलाच विजयासाठी फेव्हरीट मानण्यात येत होतं आणि अपेक्षेप्रमाणे नरसिंगने महाराष्ट्र केसरीचं अजिंक्यपद पटकावलं. महाराष्ट्र केसरी ही कुस्तीस्पर्धा महाराष्ट्रात फार प्रतिष्ठेची मानली जाते.

दरम्य़ान, 2011 मध्ये त्याने समाधान घोडकेवर मात करत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकली होती. आणि आता नरसिंगने आपलं अजिंक्यपद कायम राखण्यात यश मिळवलं. नरसिंग कॉमनवेल्थ गेम्स विजेता असल्याने त्याला विजय चौधरीवर मात करण्यात फारसे कष्ट पडले नाहीत.

First Published: Monday, December 24, 2012, 23:55


comments powered by Disqus