जागतिक कुस्ती स्पर्धेत बजरंगची कांस्य पदकाची कमाई

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 08:42

जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंचा दबदबा पहायला मिळतोय. अमित कुमारपाठोपाठ भारतीय कुस्तीपटू बजरंगनंही कांस्य पदकाची कमाई केली आहे. बजरंगनं ६० किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं. त्यामुळं जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय मल्लांनी दोन पदकांची कमाई केलीय.

जागतिक कुस्ती स्पर्धा: भारताच्या अमितकुमारला रौप्यपदक

Last Updated: Tuesday, September 17, 2013, 09:42

जागतिक कुस्ती स्पर्धेतील ५५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या आशिया चॅम्पियन अमितकुमारनं रौप्यपदक जिंकलंय.

अखेर ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचा समावेश

Last Updated: Sunday, September 8, 2013, 22:12

2020 मधील ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचा समावेश करण्यात आला आहे. मतदानाच्या आधारावर कुस्तीनं बाजी मारली. स्क्कॉश, बेसबॉल यासारख्या खेळांना चितपट करत कुस्तीनं ऑलिम्पिकमध्ये आपलं स्थान पक्क केलं.

अन्यथा आम्ही पदकं परत करू- कुस्तीवीर

Last Updated: Thursday, March 7, 2013, 22:14

२०२०च्या ऑलिम्पिकमधून कुस्तीला हद्दपार करण्यात आलं आहे. या गोष्टीला भारतातील नामांकीत कुस्तीवीर सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त यांनी विरोध केला आहे. कुस्तीच्या हद्दपारीच्या निषेधार्थ आपल्याला यापूर्वी मिळालेली पदकंही परत करण्यास हे तयार झाले आहेत.

औरंगाबादमध्ये रोबोंची कुस्ती!

Last Updated: Thursday, February 14, 2013, 20:15

टीव्ही आणि खेळण्यातील रोबो आपण नेहमी पाहतो. परंतु विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोंची कुस्ती प्रत्यक्षात पाहता आली तर त्यासारखा दुसरा कोणता अनुभव नाही. असाच अनोखा अनुभव गोव्यात भरवलेल्या स्पर्धेत अनेकांनी घेतला. या स्पर्धेत औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

कुस्तीला `ऑलिम्पिक २०२०`मधून वगळलं!

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 09:44

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं (आयओसी) कुस्तीला २०२०च्या ऑलिम्पिक खेळांमधून बाहेरचा रस्ता दाखवलाय.

`महापौर केसरी`वरून राष्ट्रवादी आणि विरोधकांमध्ये कुस्ती

Last Updated: Thursday, January 3, 2013, 23:23

पुणे महापालिकेत सध्या राजकीय कुस्तीचा आखाडा चांगलाच रंगलाय. त्यासाठी निमित्त ठरलंय ते महापौर केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं...या स्पर्धेसाठी महापालिका दीड कोटी रुपये खर्च करणार आहे. मात्र, महापालिकेनं निधीची ही तरतूद केली आहे ती, विकास कामांना कात्री लाऊन.

नरसिंग यादव सलग दुस-यांदा महाराष्ट्र केसरी

Last Updated: Monday, December 24, 2012, 23:55

मुंबईचा कुस्तीपटू नरसिंग यादवनं सलग दुस-यांदा महाराष्ट्र केसरीची गदा पटाकवलीय. नरसिंगने विजय चौधरीला चितपट करत 56व्या महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली.

महाराष्ट्राला कुणी 'मल्ल देता का मल्ल'?

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 12:04

कुस्तीमधली सर्वोच्च मानली जाणारी हिंदकेसरी स्पर्धा कोल्हापूरात होणार आहे. मात्र हिंदकेसरी कुस्तीसाठी महाराष्ट्रात तुल्यबळ मल्ल सापडत नाही. त्यामुळे हिंदकेसरीची गदा परराज्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.