पी. गोपीचंदने केला प्राजक्ता सावंतचा मानसिक छळ?, P. Gopichand on pooja Sawant

पी. गोपीचंदने केला प्राजक्ता सावंतचा मानसिक छळ?

पी. गोपीचंदने केला प्राजक्ता सावंतचा मानसिक छळ?
www.24taas.com, मुंबई

स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतने राष्ट्रीय बॅडमिंटनचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांच्यावर मानसिक छळ केल्याचा व प्रशिक्षण शिबिरातून डावलल्याचा आरोप केला होता. याबाबत आपल्याला न्याय मिळावा म्हणून तिने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने तत्काळ दखल घेऊन सुनावणी करीत प्राजक्ताच्या बाजूने निकाल दिला आहे.

यामुळे प्राजक्ताला राष्ट्रीय संघात शिबीरासाठी सहभागी होण्याची परवानगी मिळाली आहे. १९ वर्षीय प्राजक्ताने आतापर्यंत सात आंतरराष्ट्रीय पदके मिळविली आहेत.

राष्ट्रीय शिबिरात सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर, गोपीचंद यांनी मानसिक छळ करण्याचा आरोप करीत प्राजक्ताने कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला होता. आगामी चायना ओपन सुपर सिरीज, हाँगकाँग ओपन सिरीज, मकाऊ ग्रां. प्री. स्पर्धेसाठी तिची निवड नि:पक्ष आणि मेरिटच्या आधारावर व्हावी, असा आदेशही कोर्टाने यावेळी दिला.

First Published: Thursday, November 8, 2012, 11:24


comments powered by Disqus