राही सरनौबतला शूटिंग वर्ल्ड कपमध्ये गोल्ड मेडल, Rahi Sarnobat shooting world cup gold medal

राही सरनौबतला शूटिंग वर्ल्ड कपमध्ये गोल्ड मेडल

राही सरनौबतला शूटिंग वर्ल्ड कपमध्ये गोल्ड मेडल
www.24taas.com, दक्षिण कोरिया

महाराष्ट्राची शूटर राही सरनौबतने आयएसएसएफ शूटिंग वर्ल्ड कपमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं आहे. दक्षिण कोरियातील चँगवाँग इथं सुरु असलेल्या इंटरनॅशनल शूटिंग फेडरेशनच्या या वर्ल्ड कप स्पर्धेत २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात तिने हे गोल्ड मेडल मिळवलं आहे.

दक्षिण कोरियाच्या किम कियाँग हिला फायनलमध्ये पराभूत करत तिने गोल्ड मेडलवर नाव कोरलं आहे. राही सरनौबत ही महाराष्ट्राची अव्वल शूटर्सपैकी एक प्लेअर आहे.

लंडन ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक खेळात भारतीय टीममध्ये असलेली एकमेव महाराष्ट्रीय प्लेअर होती. त्यामुळे ब्राझील ऑलिम्पिक मध्ये राही कडून पदकाची अपेक्षा केली जाते आहे.

First Published: Friday, April 5, 2013, 16:53


comments powered by Disqus