Last Updated: Friday, August 9, 2013, 16:23
www.24taas.com, झी मीडिया, बीजिंगजागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतच सायना नेहवालचा पराभव झाल्यानं स्पर्धेतलं तिचं आव्हानही संपुष्टात आलं. सायनाबरोबरच पी. कश्यपचाही पराभव झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात कोरियाच्या यॉन जू बे हिने सायनाचा पराभव केला. सुमारे ४० मिनिटं चाललेल्या सामन्यात बे हिने २१-२३ आणि ९-१२ अशा दोन सेटमध्ये सायनाचा पराभव केला.
सुरुवातीपासूनच बे ने प्रहार करत सामना आपल्याकडे झुकवला होता. बेच्या आक्रमक खेळामुळे सायनाला सामन्यात डोकं वर काढता आलं नाही. यापूर्वी २००९ आणि २०११ मध्ये उपांत्यपूर्व फेरीतूनच सायनाला गाशा गुंडाळावा लागला होता. पण लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक मिळवलेल्या सायनाकडून भारताला या स्पर्धेत मोठ्या अपेक्षा होत्या.
पी. कश्यपलाही स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. जवळपास सव्वातास चाललेल्या अटीतटीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या चीनच्या डू पेंग्य याने कश्यपचा २१-१६, २०-२२ आणि १५-२१ अशा तीन सेटमध्ये पराभव केला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, August 9, 2013, 16:22