सायना डेन्मार्क ओपनच्या उपान्त्यपूर्व फेरीत Saina Nehwal enters in quarter finals

सायना डेन्मार्क ओपनच्या उपान्त्यपूर्व फेरीत

सायना डेन्मार्क ओपनच्या उपान्त्यपूर्व फेरीत
www.24taas.com,

भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल डेन्मार्क ओपन स्पर्धेत आपली कामगिरी उंचावत आहे. सायनाने जपानच्या मिनात्सू मितानी हिचा पराभव करून उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

सध्या जागतिक क्रमवारीमध्ये २८व्या क्रमांकावर असलेल्या सायनाने आपली यशस्वी घोडदौड चालू ठेवली आहे. सायनाने मिनात्सू मितानीचा २१-१५ आणि २१-१४ने पराभव केला.

डेन्मार्क ओपनमध्ये सौरभ वर्मा या भारतीय खेळाडूनेदेखील आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. २१-१८, २१-१४ने त्याने पीटर गॅडेचा पराभव करून दुसऱ्या फेरीत गेला आहे. तर अजय जयरामने चीनच्या सातव्या रँकवर असलेल्या पेंग्यू डू ने २१-१९, ८-२१ आणि ९-२१ असा पराभव केला.

First Published: Saturday, October 20, 2012, 13:38


comments powered by Disqus