सायना नेहवाल अंतिम फेरीत, Saina Nehwal in final round

सायना नेहवाल अंतिम फेरीत

सायना नेहवाल अंतिम फेरीत
www.24taas.com, ऑडेन्स

भारताच्या सायना नेहवालने डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत तिस-या मानांकित सायनासमोर अव्वल मानांकित चीनच्या यिहान वॅँगचे आव्हान होते. मात्र दुखापतीमुळे यिहानने माघार घेतली.

दुस-या गेममध्ये १२-२१, ७-१२ अशा पिछाडीवर असताना यिहानने दुखापतीमुळे माघार घेतली. त्यामुळे सायनाचा अंतिम फेरीचा मार्ग मोकळा झाला. वँगविरुद्ध यापूर्वीच्या सहा लढतीत पराभव पाहावा लागला होता. त्यातच उपांत्य फेरीत तिला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. मात्र १-५ अशा पिछाडीनंतर सायनाने खेळ उंचावला. पहिला गेम सहज जिंकलेल्या सायनाने उंचावलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर दुस-या गेममध्येही सातत्य राखले.

सायना १२-७ अशी आघाडीवर असताना यिहानची दुखापत बळावली. त्यामुळे तिने सामना सोडण्याचा निर्णय घेतला. अंतिम फेरीत सायनासमोर सहाव्या मानांकित जर्मनीच्या ज्युलियन शेंकचे आव्हान असणार आहे.

First Published: Saturday, October 20, 2012, 21:42


comments powered by Disqus