भविष्य : फुटबॉल वर्ल्डकपमध्ये `शाहीन`ची हॅट्रिक,shahin announce third time wrong prediction

भविष्य : फुटबॉल वर्ल्डकपमध्ये `शाहीन`ची हॅट्रिक

 भविष्य : फुटबॉल वर्ल्डकपमध्ये `शाहीन`ची हॅट्रिक
www.224taas.com, वृत्तसंस्था, ब्राझील

फुटबॉल वर्ल्डकपमधील भविष्यवाणी करणारा शाहीन सुरुवातील हिरो झाला. त्याने सांगितलेली सुरुवातीची भविष्य अचूक ठरलीत. मात्र, त्यानंतर पुढची तिन्ही भविष्य चुकीची ठरलीत. त्याच्या चुकीच्या भविष्यवाणीची हॅट्रिक झालीय.

भविष्यवाणी करणारा शाहीन हा उंट आहे. हा शाहीन दुबईमध्ये आहे. मात्र, त्यांने सांगितलेली तिनही भविष्य चुकल्याने अनेकांची त्याच्याबाबतीत असलेली उत्सुकता ओसरलेय.

बुधवारी स्पेन आणि चिलीमध्ये सुरु असलेल्या सामन्यात स्पेन संघाला कौल दिला होता. त्याची ही भविष्यवाणी फेल ठरली. या सामन्यात स्पेन हरला नाही तर वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. स्पेन हा गतवर्षीचा वर्ल्डकपचा विजेता आहे.

शाहिनने आतापर्यंत चार अचूक भविष्यवाणी केल्यानंतर लागोपाठ चुकीची भविष्यवाणी केल्याने चाहत्यांचा उत्साहच संपला आहे.

पॉलसोबत केली तुलना
सुरवातीला चार भविष्यवाणी अचूक केल्यानंतर शाहिनची तुलना 2010 मध्ये असलेला ऑक्टोपस पॉल सोबत करायला सुरुवात झाली होती. ऑक्टोपसने फक्त मॅचचे भविष्यवाणी केलं नसून वर्ल्डकपला कोणता संघ जिंकेल यांचही पहिलचं नाव सांगितले होते.

पुढचा डाव इंग्लंडसाठी
तिने कौल चुकले तरीही शाहिनने पुन्हा भविष्यवाणी केलेय. गुरुवारी इंग्लंड आणि उरुग्वेमध्ये होणाऱ्या मॅचसाठी शाहिनने इंग्लंडच्या बाजूने कौल दिला आहे. परंतु चाहत्यांना वाटेतेय की शाहिनची ही भविष्यवाणी खोटी ठरावी. तसंही चूक - अचूक भविष्यवाणीत ही शाहिनचा स्कोर हा 3-4 असेल.




* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 19, 2014, 11:31


comments powered by Disqus