भविष्य : फुटबॉल वर्ल्डकपमध्ये `शाहीन`ची हॅट्रिक

Last Updated: Thursday, June 19, 2014, 11:31

फुटबॉल वर्ल्डकपमधील भविष्यवाणी करणारा शाहीन सुरुवातील हिरो झाला. त्याने सांगितलेली सुरुवातीची भविष्य अचूक ठरलीत. मात्र, त्यानंतर पुढची तिन्ही भविष्य चुकीची ठरलीत. त्याच्या चुकीच्या भविष्यवाणीची हॅट्रिक झालीय.

अकरावी आॅनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 09:03

दहावी परीक्षेत मुलींनी बाजी मारली. आपणच गुणवंत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिलेय. आता निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी आॅनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण उपसंचालकांनी जाहीर केलेय. यानुसार १८ ते २५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करता येतील.

आता, संवाद साधा तुमची भाषा न समजणाऱ्यांसोबत!

Last Updated: Thursday, May 29, 2014, 19:45

सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीनं ‘रिअल टाईम व्हॉइस ट्रान्सलेशन’च्या सुविधा निर्माण केल्याचा दावा केलाय.

थो़ड्याच वेळात नरेंद्र मोदी आणि नवाझ शऱीफ यांची भेट

Last Updated: Tuesday, May 27, 2014, 15:06

थोड्याच वेळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट होणार आहे.

LIVE UPDATE : 'मोदींचा शपथविधी`, दिवसभरातील `टाईम लाईन`

Last Updated: Monday, May 26, 2014, 20:29

नरेंद्र मोदी यांच्यासह 46 मंत्र्यांनी आज शपथ घेतली. उद्या सकाळी 8 वाजता नरेंद्र मोदी आपला पदभार स्वीकारणार आहे.

आघाडी सरकारला जाग, टोल दर काढणार तोडगा

Last Updated: Friday, May 23, 2014, 11:39

मुंबई आग्रा महामार्गावरील पिंपळगाव टोल नाक्याच्या दरवाढीसंदर्भात तोडगा काढण्यासाठी आज जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आलीय. बैठकीला पीएनजी कंपनीचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

मोदींच्या त्सुनामीनं सेन्सेक्स उसळला, रुपयाही खणखणला!

Last Updated: Friday, May 16, 2014, 16:40

केंद्रात नरेंद्र मोदी भाजपला मिळत असलेल्या भरघोस यशानंतर आता सेन्सेक्सनंही उसळी घेतलीय. भाजपच्या कमळाप्रमाणेच शेअर बाजारही भलताच फुललाय.

हिंदुजा ब्रदर्स इंग्लंडमधील श्रीमंतात पहिले

Last Updated: Monday, May 12, 2014, 17:35

इंग्लंडमध्ये भारतीयांचा भरणा भरपूर आहे. पण याच भारतीयांमध्ये जर का श्रीमंत व्यक्तींची नावं घेण्याची वेळ आलीचं, तर आता या यादीत इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून हिंदुजा ब्रदर्सचं नाव हे अग्रगण्यं राहणार आहे.

अरे बापरे, टोल होणार चौपट..

Last Updated: Sunday, May 11, 2014, 20:59

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावचा टोल नाक्याचे दर आता चौपट होणार आहेत. सोमवारपासून हा निर्णय लागू होणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणाने जाहीर केलंय..

पंतप्रधानांच्या निवासस्थानी `पॅकअप`ची तयारी

Last Updated: Friday, May 9, 2014, 14:29

भारताच्या पंतप्रधानांचं निवासस्थान 7 रेसकोर्स रोडवर सध्या लगबग सुरू आहे, ही लगबग पंतप्रधानांच्या सामानाच्या आवरा आवर आहे.

अनधिकृत बांधकाम पाडण्याचं वेळापत्रक देण्याचे आदेश

Last Updated: Thursday, March 20, 2014, 23:28

अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पिंपरीत पुन्हा एकदा उफाळलाय. अनधिकृत बांधकामांवर हातोडा कधी पडणार याचं वेळापत्रक जाहीर करण्याचे आदेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.

लोकलचे डबे घसरल्याने वाहतुकीत झालेले बदल

Last Updated: Thursday, March 20, 2014, 19:45

सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलचे ५ डबे टिटवाळा ते आंबिवली दरम्यान निसटले, आणि कल्याण- कसारा, कसारा-मुंबई लोकलसेवा ठप्प झाली

लवकरच येतोय फेसबुकचा नवा लूक

Last Updated: Sunday, March 16, 2014, 08:27

फेसबुकप्रेमींना लवकरच नवीन लुकमध्ये फेसबुक प्रोफाईल आणि फॅन पेज बघायला मिळणार आहे. या नवीन लुकमधून यूजर्सला हवी असलेली माहिती शोधता येईल.

वेळापत्रक: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०१४

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 15:15

आगामी १६मार्च २०१४ पासून टी-२० वर्ल्डकपला बांग्लादेशमध्ये सुरूवात होणार आहे. तर फायनल मॅच ६ एप्रिल २०१४ला होईल. कप्तान महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया टी-२० वर्ल्डकपसाठी मैदानात उतरणार आहे. क्रिकेट आणि मनोरंजन असं टी-२० क्रिकेटचं ब्रीद आहे.

महाराष्ट्रातील निवडणुकीचे वेळापत्रक

Last Updated: Wednesday, March 5, 2014, 15:28

लोकसभा निवडणूक कधी होणार याची उत्सुकता संपली आज निवडणुकीची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील तिन्ही टप्प्यांतील निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

`दगडू`च्या `प्राजक्ता`चा आज वाढदिवस

Last Updated: Saturday, February 22, 2014, 11:50

माहित आहे का?, आज दगडूच्या प्राजक्ताचा वाढदिवस आहे. अर्थात अभिनेत्री केतकी माटेगावकरचा, केतकीचा मराठी चित्रपटातला हा प्रवास उल्लेखनीय ठरला आहे.

संजय दत्तला शेवटची पॅरोल रजा मंजूर

Last Updated: Tuesday, February 18, 2014, 19:41

अभिनेता संजय दत्त याला पुन्हा एकदा वाढीव पॅरोल रजा मंजूर करण्यात आलीय. पत्नी मान्यता दत्त हिच्या आजारपणाच्या निमित्तानं त्याला आणखीन महिनाभराची वाढीव रजा मंजूर झालीय.

`टाइमपास`ची रेकॉर्डब्रेक कमाई, जल्लोषात सक्सेस पार्टी

Last Updated: Thursday, February 6, 2014, 20:39

टाइमपास या मराठी सिनेमाने ३० कोटींच्या वर कमाई करत मराठी सिनेमांच्या गल्ल्यात एक मोठी भर टाकली. या रेकॉर्डब्रेक कमाईने मराठी सिनेसृष्टीत एक इतिहास देखील रचला.याच निमित्ताने टाइमपासच्या टीमने जोरदार जल्लोषात सक्सेस पार्टी आयोजित केली.

दगडू-प्राजक्तानं वेड लावलं, `टाइमपास` झाला ३० कोटींचा!

Last Updated: Saturday, January 25, 2014, 08:02

मराठी सिनेजगतात प्रथमच तीन आठवड्यात ३० कोटींची विक्रमी कमाई करुन `टाइमपास` या सिनेमानं इतिहास रचलाय. एस्सेल व्हिजन निर्मित `टाइमपास` या सिनेमानं मराठी सिनेमांच्या इतिहासात अभूतपूर्व विक्रमी नोंद केली आहे.

`प्राजक्ता`ला वेड लागल्यानंतर, दगडूही झाला `येडा`

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 21:03

टाईमपास सिनेमातल्या प्राजक्ताने तर आधीच आपल्याला वेड लागलं असल्याचं सांगितलंय. मात्र आपला दगडूही आता येडा झाला आहे. कारण आईबाबा आणि साईबाबांची शप्पथ घेऊन सांगतो, टाईमपास सिनेमा २८ कोटी रूपयांच्या घरात जाऊन पोहोचलाय.

‘टाइमपास’साठी मनसे सरसावली, बनावट सीडींची होळी

Last Updated: Monday, January 13, 2014, 19:33

बॉक्स ऑफिसवर गाजत असलेल्या टाइमपास सिनेमाच्या पायरेटेड सीडींची विक्री करणा-यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाचा हिसका दाखवला..फुटपाथवर पायरेटेड सीडींची विक्री करणा-यांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांनी टाइमपासच्या पायरेटेड सीडीज ताब्यात घेवून त्याची होळी केली.

`टाइमपास`ला पेपरवाल्यांचा दणका!

Last Updated: Monday, January 13, 2014, 07:37

‘टाईमपास’ सिनेमा मराठी प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यात चांगलाच यशस्वी ठरलाय. पण, याच सिनेमावर वृत्तपत्र विक्रेते मात्र नाराज आहेत.

मराठीतील `टाइमपास`चा गल्ला १४ कोटी रूपयांचा

Last Updated: Saturday, January 11, 2014, 20:14

टाइमपास या सिनेमानं आणखी एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. एका आठवड्यातच सिनेमानं१४ कोटींचा आकडा पार केलाय. याच बरोबर प्रेक्षकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे विकेंडमध्ये राज्यभरात शोची संख्याही वाढवण्यात आली आहे.

प्रेक्षकांना वेड लागले ‘टाइमपास’चे

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 18:02

‘हम गरीब हुए तो क्या हुआ दिलसे आमिर है...’ हा डायलॉग सध्या प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळतोय. रवी जाधव दिग्दर्शित टाईमपास या सिनेमानं सगळ्यांनाच भूरळ घातलीये.

मराठीत `टाईमपास` सिनेमा `कमाई`चा नवा विक्रम गाठणार?

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 09:29

टाईमपास या सिनेमाने दिवसात साडेसहा कोटी रूपयांची कमाई केली आहे. यामुळे मराठीत टाईमपास सिनेमा कमाईचा नवा विक्रम गाठेल, असं म्हटलं जात आहे.

`टाइमपास`... माझ्या आयुष्यातला

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 16:18

कोण म्हणतं आयुष्यात गेलेले दिवस पुन्हा येत नाहीत..? रविवारी `टाइमपास` हा सिनेमा पाहताना, मला तर भरभर २० वर्षे मागे गेल्यासारखं वाटलं... पडद्यावर जे दिसत होतं, ते त्याकाळी आपणही अनुभवलं होतं, याची जाणीव झाली... जुन्या फोटोंचा अल्बम किंवा व्हिडिओ पाहतोय, असं वाटू लागलं... त्यातला `दगडू`ला आपण नखशिखांत ओळखतो, याची खात्री पटली. त्यातली `प्राजक्ता` तर माझी `शेजारीण`च... सख्खी शेजारीण...

गरीब 'दगडू' आणि अल्लड 'प्राजक्ता'चं प्रेम ५ कोटींवर

Last Updated: Sunday, January 5, 2014, 13:57

दगडू आणि प्राजक्ताच्या केमेस्ट्रीने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. यामुळे टाईमपासवर टीका करणाऱ्या चित्रपट विश्लेषकांना हा केमिकल लोचा असल्याचं म्हणून समाधान मानावं लागेल.

गब्बर, `दगडू` नही डरेगा, `थ्रीडी शोले` के सामने लढेगा

Last Updated: Saturday, January 4, 2014, 22:27

मराठीतला `टाईमपास` सिनेमा हाऊस फुल सुरू असतांना, विश्लेषकांनी या सिनेमाला जाडजूड भिंग लावून पाहण्याचं सुरूच ठेवलं आहे. `टाईमपास` असं या सिनेमाचं नाव असतांना प्रकरण फारसं गंभीर घ्यायचं काही कारणचं नाहीय.

‘टाइमपास’चे डायलॉग व्हॉट्स अपवर फेमस...

Last Updated: Friday, January 3, 2014, 19:16

केतकी माटकेगावकर आणि प्रथमेश परब म्हणजे प्राजक्ता आणि दगडू यांच्या टाइमपास हा सिनेमा आज रिलीज झाला. पहिल्याच दिवशी या सिनेमाला हाऊसफूल्लचा बोर्ड लागला. हा हाऊसफूल्लचा बोर्ड हा त्याच्या चांगल्या प्रमोशनमुळे आण त्याच्या डायलॉगमुळे लागला.

शोले थ्रीडी, टाईमपास,जोबी करवालो आज प्रेक्षकांच्या भेटीला

Last Updated: Friday, January 3, 2014, 13:12

आज फस्ट डे फस्ट शोचा दिवस. अर्थात शुक्रवार. बॉलिवूडचा अत्यंत गाजलेला ‘शोले’ हा ‘थ्रीडी’ रुपात पुन्हा एकदा रिलीज केला जातोय. तसेच सध्या ज्याच्या गाण्यांनी सर्वांना भुरळ घातलीय़ असा झी टॉकीजचा ‘टाईमपास’ आणि अर्शद वारसीचा ‘जोबी करवालो’ हे चित्रपट वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

वेळापत्रक : ... असे असतील २०१४ मध्ये टीम इंडियाचे दौरे!

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 08:37

२०१३ या वर्षात मायदेशात शेर पण, परदेश दौऱ्यात ढेर ठरलेल्या टीम इंडियाला पुढच्या वर्षी कोणत्या सामन्यांना तोंड द्यावं लागणार आहे, हे आता स्पष्ट झालंय. टीम इंडिया २०१४ साली खेळणाऱ्या मॅचेसचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. सप्टेंबर २०१४ पर्यंतचं हे दौरे आखण्यात आलेत.

सुरु होणार धोनीच्या यंगिस्तानची खरी टेस्ट!

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 15:26

महेंद्रसिंग धोनीच्या यंगिस्तानची खरी टेस्ट सुरु होईल ती दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये. जोहान्सबर्गमध्ये भारत आणि आफ्रिका यांच्यातील पहिली वन-डे रंगणार आहे. होम अॅडव्हानटेज डिव्हिलियर्सच्या टीमला असणार आहे. त्यामुळं धोनी अँड कंपनी आपल्या पहिल्याच पेपरमध्ये पास होते का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

वेळापत्रक : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 14:27

वेस्ट इंडिजला घरच्या मैदानात धूळ चारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेसोबतच्या मॅचसाठी टीम इंडिया सज्ज झालीय. कर्णधार महेद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडिया साऊथ आफ्रिकेमध्ये तीन वनडे आणि दोन सामने खेळणार आहे.

मोदी टाईम्सच्या ‘पर्सन ऑफ द इअर'च्या यादीत

Last Updated: Tuesday, November 26, 2013, 15:45

भाजपचे पंतप्रधान पादाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी टाईम या प्रतिष्ठित मासिकाच्या `पर्सन ऑफ द इअर`साठीच्या मानांकितांच्या यादीत स्थान पटकावलंय.

सेंसेक्सचा विक्रमीउच्चांकवर , २१२३० टप्पा ओलांडला

Last Updated: Friday, November 1, 2013, 10:49

दिवाळीच्या पहिल्या धनत्रयोदशी शुभ मुहूर्तावर सेंसेक्सची कामगिरी विक्रमीउच्चांकवर पोहोचली आहे. आतापर्यंतच्या उच्चांकावर सेंसेक्स पोहोचला आहे. सेंसेक्सने २१२३० टप्पा ओलांडला पार केला आहे.

मिळवा... फूल टॉकटाईम आणि फ्री सिमकार्ड!

Last Updated: Thursday, October 31, 2013, 13:29

स्पर्धेच्या युगात प्रत्येक कंपनी आपल्या उपभोक्त्यांना आकर्षित करण्यासाठी नवीन-नवीन संकल्पनांचा घाट घालत असते. त्यात दिवाळीत तर ऑफर्स वर ऑफर्स...याच दिवाळीच्या मुहूर्ताची संधी साधून बीएसएनएल ने एक नवीन योजना जाहीर केली आहे. ही योजना म्हणजे १०, २० आणि ५० रूपयांच्या टॉप-अप रिचार्जवर फुल टॉकटाइम आणि टू जी आणि थ्री जीचे सिमकार्ड मोफत देण्यात येणार आहे.

आमिर खानच्या `पीके` युनिट दिग्दर्शकाला अटक

Last Updated: Saturday, October 12, 2013, 11:13

आमिर खानच्या आगामी चित्रपट `पीके`च्या एका युनिट दिग्दर्शकाला धार्मिक भावना दुखावल्याबद्दल अटक केली असल्याचे शुक्रवारी पोलीसांनी सांगितले. `पी.के.` चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान या युनिट दिग्दर्शकाने धार्मिक भावना दुखावणारे दृश्य चित्रीत केल्याप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आली आहे.

वेळापत्रक : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया २०१३

Last Updated: Wednesday, October 9, 2013, 16:48

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी - ट्वेन्टी सीरीज गुरुवारपासून सुरू होतेय. पाहुयात... कधी कधी होणार आहेत या मॅचेस आणि कुठे...

भारतात पहिल्यांदाच... ‘शोन कॉम्प्लेक्स’वर दुर्मिळ हार्ट सर्जरी!

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 11:11

मुंबईतल्या जसलोक हॉस्पीटलमध्ये अवघ्या चार वर्षांच्या नायजेरियन मुलावर दुर्मिळ अशी हार्ट सर्जरी पार पडलीय. यामुळं शोन कॉम्प्लेक्स या जीवघेण्या हदयरोगापासून त्याला मुक्ती मिळालीय. भारतात पहिल्यांदाच ही हार्ट सर्जरी पार पडलीय.

विद्यार्थ्यांकडे `टाईमपास`साठी `टाईम`च नाही!

Last Updated: Saturday, September 21, 2013, 22:33

कॉलेज म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते रंगीबेरंगी, फॅशनेबल कपड्यांत वावरणारे आणि कट्ट्या-कट्ट्यांवर ‘टाईमपास’ करणारे तरुण-तरुणी... होय ना! पण, हेच चित्र बदलतंय किंबहुना बदललंय असंच म्हणावं लागेल.

रुपयाची रसातळाकडे वाटचाल...

Last Updated: Thursday, August 22, 2013, 10:18

रुपयाची ऐतिहासिक घसरण सुरूच आहे. रिझर्व बँकेच्या हस्तक्षेपानंतरही रुपयाची रसातळाकडे वाटचाल सुरू आहे. आज सकाळी बाजार सुरू होताच रुपयाचं मूल्य ६५.१० वर पोचले. तीन महिन्यात रुपयाची 17 टक्के घसरण झालीय.

रिव्हयू : वन्स अपॉन टाईम इन मुंबई दोबारा

Last Updated: Thursday, August 15, 2013, 19:04

एकता कपूर निर्मित ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई दोबारा’ आज प्रदर्शित झाला. हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित न होता आज प्रदर्शित झाला आहे. अनेक जण या सिनेमाची वाट पाहत होतो पण अक्षय कुमारच्या चाहत्यांना तो कोणत्या भुमिकेत आहे हे पाहण्याची आधिकच उत्सुकता होती.

विद्या बालनचं 'सरप्राईज पॅकेज'!

Last Updated: Thursday, August 15, 2013, 13:30

अभिनेत्री विद्या बालन हीदेखील ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दुबारा’ या सिनेमाच्या यशासाठी उत्सुक होती... विद्या का ‘वन्स अपॉन’ची वाहवा करतेय हा प्रश्न अनेकांना पडला होता... आज हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांना या प्रश्नाचं उत्तर मिळालंय.

सोनाक्षीच्या कामानं इमरान प्रभावित!

Last Updated: Monday, August 12, 2013, 18:48

दिग्दर्शक मिलन लुथरियांचा ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’ या चित्रपटात काम करणारा अभिनेता इमरान खान आपली सहअभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या कामानं खूप प्रभावित झालाय. सोनाक्षीचं काम, वेळेचं महत्त्व आणि काम करण्याची पद्धत अतिशय प्रभावित करणारी आहे, असं म्हणणं आहे इमरानचं.

जॅकी चॅनचा दुसऱ्यांदा मृत्यू...

Last Updated: Thursday, August 8, 2013, 15:16

‘आपल्याच मृत्यूची बातमी वाचून धक्का बसला आणि वाईटही वाटलं’ असं स्पष्ट केलंय ५९ वर्षीय प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॅकी चॅननं…

पाहा... बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक (मार्च २०१४)

Last Updated: Tuesday, July 2, 2013, 13:08

बारावीचं पुढच्या वर्षाचं म्हणजेच मार्च २०१४ चं परिक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय.

पहिल्यांदा सल्लू दिसला नव्या गर्लफ्रेंडसोबत

Last Updated: Saturday, June 29, 2013, 19:35

सलमानची लव लाइफ सध्या चर्चेत आहे. सलमानचं रोमानियन अभिनेत्री लुलिया वेंतूरसोबत गॅटमॅट सुरू असल्याच्या अफवांनी बी टाऊनमध्ये चर्चेला उधाण आला आहे.

सोनाक्षीचं झालं पुन्हा एकदा नामकरण...

Last Updated: Monday, June 24, 2013, 12:46

सोनाक्षी सिन्हा हिचा आगामी ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई अगेन’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडू नये यासाठी तिचं नाव बदलण्यात आलंय.

बोले तैसा चाले त्याची...

Last Updated: Thursday, June 20, 2013, 08:10

आपल्या जीवनात वेळेला खूप महत्त्व आहे. वेळेचा उपयोग एखादा मनुष्य कशा रीतीने करतो, त्यावर त्याचे मोठेपण अवलंबून असते.

अंघोळ करण्याची नेमकी योग्य वेळ कुठली?

Last Updated: Sunday, June 9, 2013, 21:34

हिंदू धर्मात दररोज अंघोळ करण्यास सांगितलं आहे. स्वच्छता आणि शुचिर्भूतता यासाठी पहाटे स्नान करावं असं शास्त्रांत सांगितलं आहे. पण अनेक जण आपल्या सोयीनुसार संध्याकाळी अंघोळ करतात. अंघोळ करण्याची नेमकी योग्य वेळ कुठली?

कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक

Last Updated: Thursday, June 6, 2013, 08:28

कोकण रेल्वेने मान्सूनसाठीचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार काही गाडयांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. हे नवे वेळापत्रक १० जून ते ३१ ऑक्टोबरसाठी लागू असेल.

लैंगिक संबंधांचा काळ कमी होतोय...

Last Updated: Friday, May 3, 2013, 09:36

सेक्स हा मानवी जीवनातील अविभाज्य असा भाग आहे. मात्र सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सेक्स करण्याचा काळ कमी होत आहे.

बराक ओबामांची भेट घेणार आमिर खान

Last Updated: Tuesday, April 23, 2013, 16:14

चर्चेत असणाऱ्या ‘टाइम’ मॅगझीनच्या मुखपृष्ठावर या वर्षी स्थान पटकावणारा आमिर खान हा लवकरच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेट घेऊन चर्चा करणार आहे.

‘ऑल टाईम ग्रेट टेस्ट टीम’मधून सचिन आऊट!

Last Updated: Friday, April 19, 2013, 14:25

सचिन तेंडुलकरला या टीममधून वगळण्यात आलंय. टेस्टमधील ग्रेटेस्ट बॅट्समन असूनही मास्टर-ब्लास्टर स्थान न दिल्यानं क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसलाय.

'एमपीएससी परीक्षा वेळेतच घेणार....'

Last Updated: Wednesday, April 3, 2013, 18:22

एमपीएससीच्या परीक्षेबाबत गोंधळ सुरू असला तरी परीक्षा वेळेतच घेण्याचा निर्णय एमपीएससीनं घेतलाय. याबाबत एमपीएससीच्या सचिवांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली.

आयपीएल टी-२० क्रिकेट वेळापत्रक

Last Updated: Sunday, March 31, 2013, 08:00

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेटच्या सहाव्या मोसमाला ३ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. यंदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ऐवजी ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग करत आहे. तो भारतात दाखल झाला असून त्यांने शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर सरावही केला.

पोलीस मारहाण : निलंबित आमदारांना पोलीस कोठडी

Last Updated: Thursday, March 21, 2013, 15:43

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी निलंबित मनसेचे आमदार राम कदम आणि भारिपचे आमदार क्षितिज ठाकूर यांना आज किला कोर्टात हजर करण्यात आलेय. त्यांना २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

ठाकूर यांच्यापाठोपाठ राम कदमांचीही शरणागती

Last Updated: Thursday, March 21, 2013, 11:07

सूर्यवंशी मारहाण प्रकरणी बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्यापाठोपाठ मनसेचे आमदार राम कदम यांनीही पोलिसांसमोर शरणागती पत्करलीय.

मी स्वतःहून अटक होणार- राम कदम

Last Updated: Wednesday, March 20, 2013, 19:40

मनसे आमदार राम कदम यांनी आपण स्वतःहून अटक होणार असल्याचं जाहीर केलं आहे. पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

मनसे आमदार राम कदमांचे दुसऱ्यांदा निलंबन

Last Updated: Wednesday, March 20, 2013, 16:59

मनसे आमदार राम कदम यांचे दुसऱ्यांदा निलंबन होत आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली.

भारताला हादरविणारे आतापर्यंतचे बॉम्बस्फोट

Last Updated: Thursday, February 21, 2013, 21:05

गेल्या वीस वर्षात झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटांनी भारताला हादरवले आहे. त्या स्फोटांची यादी

रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मुंबई

Last Updated: Monday, January 21, 2013, 14:06

मुंबई टीमने ४४ व्या वेळी रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारलीय. सेमी फायनलमध्ये सर्विसेसविरूद्ध इनिंगच्या आघाडीने विजय मिळवत मुंबईने फायनल गाठली.

बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

Last Updated: Thursday, January 17, 2013, 17:58

21 फेब्रुवारी ते 27 मार्च या काळात बारावीची परीक्षा होणार आहे. बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

दुखाचं भांडवल अन् ‘जीवनगौरव’ पुरस्कार!

Last Updated: Thursday, January 3, 2013, 13:56

‘जीवनगौरवाची थेरं बंद करा’ असं म्हणत नानानं चक्क पुरस्काराच्या देवाण-घेवाणीला फैलावर घेतलंय.

नरेंद्र मोदींनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

Last Updated: Wednesday, December 26, 2012, 17:32

गुजरात भाजपचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी यांनी आज चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी गुजराती भाषेतून शपथ घेतली.

मागे वळून पाहण्याची ही आता वेळ नाही - नरेंद्र मोदी

Last Updated: Thursday, December 20, 2012, 11:59

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा करिश्मा पुन्हा एकदा गुजरातमध्ये पहायला मिळाला. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर ट्विट केलं.

ईदेच्या दिवशी सलमान-अक्षयमध्ये शर्यत

Last Updated: Wednesday, October 3, 2012, 22:28

गेली 4 वर्षं ईदच्या दिवशी सलमान खानचे सिनेमे रिलीज होत आहेत आणि ते ही ब्लॉकबस्टर हिट ठरले आहेत. वाँटेड, दबंग, बॉडीगार्ड आणि एक था टायगर यासारखे 4 धमाकेदार हिट दिल्यावर पुढच्या इदला सलमान खान शेरखान सिनेमातून लोकांसमोर येत आहे.

टाईम मॅगझीन झालं ‘आमिर`मय!

Last Updated: Friday, August 31, 2012, 15:53

आपल्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांच्या अंतरंगात पोहचण्याचा प्रयत्न करणारा आमिर खाननं आता टाईम मॅगझिनच्या कव्हर पेजवरदेखील स्थान मिळवलंय. टाईम मॅगझीनच्या कव्हर पेजवर जागा मिळवणारा आमिर पहिला भारतीय पुरुष अभिनेता आहे.

पाकिस्तानी पंचांने १५ वेळा सेक्स केला

Last Updated: Wednesday, August 15, 2012, 17:46

या मॉडेलच्या माहितीनुसार, लग्नाचे आमीष दाखवून असद यांनी १५ वेळा सेक्स केल्याचे तिने म्हटले आहे.

ओबामाही ठरले 'अंडरअचिव्हर'

Last Updated: Saturday, July 21, 2012, 17:06

... आता भारतातून प्रसिद्ध होणाऱ्या ‘आऊटलूक’ या इंग्रजी मॅगझिननं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना ‘द अंडरअचिव्हर’ ही पदवी बहाल केलीय.

'मनमोहन सिंग : सोनियाज् पुडल'

Last Updated: Tuesday, July 17, 2012, 10:19

‘अंडरअचिव्हर’ अशी पदवी मिळालेल्या भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लंडनच्या एका वृत्तपत्रानं ‘इंडियाज सेव्हिएर ऑर सोनियाज पुडल’ अशी उपाधी बहाल केलीय.

बहिरा राष्ट्रीय प्राणी कोण, तर मनमोहन सिंग- बाळासाहेब

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 11:13

पंतप्रधान मनमोहन सिंग यांना टाईम मॅगेझिननं अंडर अचिव्हर म्हणून संबोधल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीही आपल्या ठाकरी शैलीत सिंग यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ' मनमोहन सिंग हे जागतिक पातळीवरील एक हास्यास्पद प्राणी बनले आहेत

'टाइम मॅगझिन'ने पंतप्रधान ठरविले झीरो

Last Updated: Sunday, July 8, 2012, 15:41

टाइम मॅगझिन'ने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा अपेक्षेपेक्षा कमी यश मिळविणारे अर्थात 'अन्‍डरऍचिव्‍हर' व्‍यक्ती म्‍हणून उल्‍लेख करताना गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना हिरो ठरविले आहे. नरेंद्र मोदी यांना 'चतूर राजकारणी' असा उल्‍लेख केला आहे.

दहावी, बारावीचे परीक्षेचे वेळापत्रक

Last Updated: Monday, July 2, 2012, 21:27

बारावी आणि दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या वर्षी होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०१३ तर दहावीची परीक्षा दोन मार्च ते २५ मार्च २०१३ या कालावधीत होणार आहे.

झी बिझनेस ऍवॉर्डचे वितरण

Last Updated: Sunday, June 17, 2012, 12:49

राष्ट्रपतीपदासाठी युपीएचे उमेदवार म्हणून प्रणव मुखर्जींचे नाव जाहीर झाल्यानंतर प्रथमच ते मुंबईत आले. झी बिझनेसच्या बेस्ट मार्केट ऍनॅलीस्ट ऍवॉर्ड सोहळ्यासाठी ते मुंबईत आलेत. झी बिझनेसतर्फे बेस्ट मार्केट एनालिस्ट अँवॉर्ड पुरस्कारानं भारतातल्या तज्ज्ञ मार्केट एक्सपर्टसचा गौरव करण्यात आला.

आयपीएलचे उर्वरित सामने

Last Updated: Thursday, May 17, 2012, 23:50

स्यू की यांच्या नव्या पर्वाला सुरुवात

Last Updated: Thursday, May 3, 2012, 15:32

विरोधी पक्षनेत्या आँग सान स्यू की यांनी म्यानमारच्या संसदेत बुधवारी शपथ घेतली. आता खऱ्या अर्थाने स्यू की यांच्या संसदेतील प्रवेशाने एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.

नुपूरच्या तालावर क्रिकेटपट्टू फिदा

Last Updated: Monday, March 19, 2012, 19:02

बॉलिवूड कलाकार आणि मॉडेल नुपूर मेहताने सेंट्रल लंडनमधील एका कॅसिनोत क्रिकेटपट्टूंना भेटल्याची कबूली दिली आहे पण बुकीजसाठी मॅच फिक्सिंगमध्ये कोणतीही भूमिका बजावल्याविषयी इन्कार केला आहे.

नरेंद्र मोदींचा 'टाईम' येणार आहे

Last Updated: Sunday, March 18, 2012, 09:39

टाईम या प्रतिष्ठित मासिकाने आपल्या आशियाई आवृत्तीत मोदींवर कव्हर स्टोरी केली आहे.गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे येत्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या राहुल गांधींनी आव्हान देऊ शकतात असं टाईम मासिकाने म्हटलं आहे. नुकत्याच उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर मोदी येत्या संसदेच्या निवडणुकीत राहुल गांधींना आव्हान देऊ शकतात असं टाईमने म्हटलं आहे.

सचिनचं विश्वविक्रमी द्विशतक 'टाइम्स'मध्ये

Last Updated: Friday, March 16, 2012, 17:49

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वन-डे सामन्यात द. आफ्रिकेविरुद्ध झळकावलेल्या द्विशतकी कामगिरीचीची नोंद टाइम्स मॅगझिनच्या ‘ टॉप टेन स्पोर्टस् मोमेन्ट्स ’ मध्ये घेण्यात आली आहे.

कोण बनणार 'मंदाकिनी'?

Last Updated: Tuesday, March 13, 2012, 13:12

‘वन्स अपॉन टाईम इन मुंबई’ या सिनेमाचा सिक्वेल एकता कपूर घेऊन येत आहे आणि या सिक्वेलमध्ये झळकण्यासाठी बॉलिवूडच्या टॉपच्या चार अभिनेत्रींमध्ये रेस लागली आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी दीपिका, सोनम कपूर, सोनाक्षी आणि कतरिना या अभिनेत्रींनीमध्ये रेस लागली आहे.

प. रेल्वेचा वाढला वेग, फेऱ्याही वाढणार का?

Last Updated: Thursday, March 8, 2012, 08:35

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गाचे डीसी ते एसी असे विद्युत परिवर्तन पुर्ण झाल्याने आता लोकल वाढवण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटना करत आहेत. एसी विद्युत प्रणालीमुळे लोकल गाड्यांचा वेग वाढवणे शक्य होणार आहे. तेव्हा गर्दीच्या वेळी दोन लोकल गाड्यांमधील वेळ ही तीन मिनीटांपेक्षा कमी करणे शक्य होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गावर चर्चगेट ते अंधेरी असा डीसी ते एसी विद्यूत परिवर्तनाचा शेवटचा टप्पा नुकताच झाला. यामुळे या संपूर्ण उपनगरीय रेल्वे मार्गाचे एसीमध्ये विद्युत परिवर्तन पूर्ण झाले. या परिवर्तनामुळे लोकल गाड्यांचा वेग वाढवण्यास मदत होणार आहे. यामुळे जास्त अंतराच्या दोन रेल्वे स्थानकांमध्ये तर लोकल , १०० किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने धावू शकते. तेव्हा पश्चिम रेल्वे मार्गावरच्या उपनगरीय वेळापत्रकामध्ये बदल करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेनं केली आहे. लोकलचा वेग वाढवल्यास जास्त गाड्या सुरु करणे शक्य असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. जीवघेणी गर्दी अशी पश्चिम रेल्वेच्या या उपनगरीय मार्गाची ओळख आहे. एकुण १२१४ लोकलच्या फेऱ्या तब्बल ३० लाख प्रवाशांची दररोज वाहतूक करतात. तेव्हा लोकलचा वेग वाढल्यास तीन मिनीटांचा कालावधी कमी करता येणे शक्य होणार आहे.

दहावी, बारावी परीक्षेचे टाईमटेबल जाहीर

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 13:02

महाराष्ट्र राज्यात घेण्यात येणाऱ्या १० आणि १२ वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा एक मार्चला तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून होणार आहे.

अडसूळांचा टाइम्सविरोधात १०० कोटींचा दावा !

Last Updated: Saturday, January 28, 2012, 19:04

महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसच्या झालेल्या तोडफोडीचं खासदार आनंद अडसूळ यांनी समर्थन केलं आहे. इतकंच नव्हे, तर टाइम्सविरुद्ध रुपये १०० कोटींचा दावा ठोकणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

'मटा'च्या कार्यालयात शिवसैनिकांची तोडफोड

Last Updated: Saturday, January 28, 2012, 17:03

महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसमध्ये शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या आजच्या अंकात शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ राष्ट्रवादीच्या गळाला लागले असल्याची बातमी छापण्यात आली होती. त्याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी तोडफोड केली.

पाकने केली ३१ भारतीय मच्छिमारांना अटक

Last Updated: Monday, January 23, 2012, 00:48

पाकिस्तानी सामुद्रिक सुरक्षा एजन्सीने ३१ भारतीय मच्छिमारांना अटक केली तसंच १४ बोटीही जप्त केल्या. पाकिस्तानच्या सामुद्रिक हद्दीचा भंग केल्याच्या कारणावरुन ही कारवाई केल्याचं पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितलं.

टाईमलाईन फेसबुक

Last Updated: Thursday, January 5, 2012, 11:44

सोशलनेट साईटवर तुम्हाला आता फेसबुकने अधिक स्मार्ट बनविले आहे. आपली प्रोफाईल छान दिसणार आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला टाईमलाईन पाळावी लागेल. म्हणजेच फेसबुकच्या तुमच्या प्रोफाईलला ‘टाईमलाईन’ टॅग करावे लागेल. ‘टाईमलाईन’ टॅग केला की मग पहा, तुमची प्रोफाईल हायटेक दिसेल आणि तुम्ही फेसबुकच्या प्रेमात पडाल.

'द न्यू यॉर्क टाईम्स'चा 'इ-मेल' घोटाळा

Last Updated: Thursday, December 29, 2011, 14:14

प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र ‘न्यू यॉर्क टाईम्स’च्या ८० लाख वर्गणीदारांना गुरूवारी अचानक ‘न्यू यॉर्क टाईम्स’ची वर्गणी रद्द करण्याचा बेत रद्द केल्यास आम्ही तुम्हाला डिस्काऊंट देऊ’ असं सांगणारा ‘न्यू यॉर्क टाईम्स’चा इ-मेल आला.

शाहिद आणि करिना परत एकत्र?

Last Updated: Sunday, December 18, 2011, 15:35

शाहिद कपूर आणि करिना कपूर हे परत एकत्र येण्याची शक्यता आहे असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर सैफचं काय होणार असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण प्रत्यक्षात ती शक्यता फारच धूसर आहे पण सिनेमा एकत्र काम करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अण्णा ‘टाइम’ तुमचा आहे

Last Updated: Thursday, December 8, 2011, 10:17

अण्णा टाईम ‘टाईम’ की बात है

Last Updated: Monday, November 28, 2011, 09:16

ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे जनलोकापाल विधेयकासाठी केलेल्या उपोषणामुळे जगभरात पोहचले. आता लवकरच अण्णा हजारे प्रतिष्ठेच्या टाईम मासिकाच्या कव्हरवर हजेरी लावतील असं त्यांच्या एका सहकाऱ्याने सांगितलं.

करीना करणार 'दाऊद'बरोबर रोमान्स!

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 13:13

'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई'मध्ये दहशत हा मुख्य गाभा होता मात्र या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये दहशतीपेक्षाही रोमॅण्टिक अंदाज जास्त दिसेल आणि हा रोमॅन्स आपल्याला करीना कपूर सिल्व्हर स्क्रीनवर साकारताना आपल्याला दिसणार असल्याची चिन्ह आहेत.

आमच्यात 'फूट' सब 'झूठ' - अण्णा

Last Updated: Thursday, October 6, 2011, 13:08

टीम अण्णांमध्ये मतभेद असल्याचा खळबळजनक खुलासा न्यूयॉर्क टाईम्सनं केला आहे. भ्रष्टाचाराविरोधात अण्णांनी पुकारलेल्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क टाईम्सनं घेतलेली अण्णांची मुलाखत नुकताच प्रसिद्ध झाली.

लगान इन 'टाईम'

Last Updated: Sunday, October 9, 2011, 13:27

'टाइम मासिका'ने खेळावर आधारित आजवरच्या सर्वोत्तम चित्रपटांच्या यादीत 'लगान- वन्स अपॉन अ टाईम इन इंडिया'चा समावेश केला आहे. २००१मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाला या यादीत चौदावे स्थान मिळाले आहे.