‘स्माइल पिंकी’ उडवणार विम्बल्डन टॉस, Smiling` Pinki has a date with big stars at Wimbledon

‘स्माइल पिंकी’ उडवणार विम्बल्डन टॉस

‘स्माइल पिंकी’ उडवणार विम्बल्डन टॉस

www.24taas.com, झी मीडीया, लंडन

`स्माइल पिंकी` या नावानं ओळख मिळालेली पिंकी सोनकर थेट विम्बल्डनच्या मेन्स फायनलमध्ये टॉस उडवणार आहे. दुमडलेल्या ओठांचं व्यंग घेऊन जन्माला आलेल्या पिंकीवर स्माईल ट्रेन या संस्थेने मोफत सर्जरी केली होती.

2008 मध्ये तिच्या `स्माईल पिंकी` ही तिच्यावर डॉक्युमेंट्री काढण्यात आली. या डॉक्य़ुमेंट्रीला ऑस्करचा पुरस्कारही मिळाला होता. या वर्षी स्माइल ट्रेन विम्बल्डनचे पार्टनर आहेत. त्यामुळेच पिंकीला फायनलमध्ये टॉस उडवण्याचा मान मिळाला आहे.

पिंकी सोनकर... मिर्झापूर या छोट्याशा गावातून थेट लंडनला प्रवास करण्यास सज्ज झाली आहे. विम्बल्डन या टेनिसमधील मानाच्या ग्रँडस्लॅम मेन्स फायनलमध्ये टॉस करण्याचा मान तिला मिळाला आहे. 11 वर्षी पिंकी सोनकरला 7 जुलैला होणा-या फायनलमध्ये रॉजर फेडररपासून ते नोवाक जोकोविचपर्यंत अशा दिग्गज टेनिसपटूंना भेटण्याची संधी मिळणार आहे.

पिंकी सोनकरला जन्मापासूनच क्लेफ्ट लीप अर्थातच दुमडलेल्या ओठांचं व्यंग झालं होतं. 2007 मध्ये पिंकीच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक घटना घडली. स्माइल ट्रेन या जगातील सर्वात मोठ्या संस्थेनं तिच्या ओठांवर मोफत सर्जरी केली. आणि तिचं आयुष्यचं बदललं. तिच्या याच प्रवासावर 2008 मध्ये मेगन मायलन्सनं `स्माइल पिंकी` ही 39 मिनिटांची डॉक्युमेंट्री बनवली. याच डॉक्युमेंट्रीला ऑस्कर पुरस्कारही मिळाला. या डॉक्युमेंट्रीनंतरच पिंकी सोनकर या मिर्झापूरमधील छोट्याशा गावातील मुलीची ओळख संपूर्ण जगाला मिळाली. 2013 विम्बल्डनसाठी स्माइल ट्रेन ही संस्था चॅरिटी पार्टनर आहे.

पिंकी त्यांची पेशंट असल्यानं तिला यावेळी विम्बल्डनच्या फायनलमध्ये टॉस उडवण्याचा मान मिळणार आहे. विम्बल्डनपूर्वी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर पार्कमध्ये विम्बल्डन सेलिब्रेशनमध्ये पिंकी सहभागी होणार आहे. यावेळी तिला मोनिका सेलेस आणि जिम कुरियरला भेटण्याची संधी मिळेल. विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर मॅच पाहण्य़ाचं स्वप्न हे अनेकांचं असतं. मात्र, पिंकी सोनकरसाठी हे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, June 18, 2013, 20:01


comments powered by Disqus