फ्रान्सच्या बार्तोलीचा टेनिस करिअरला अलविदा!

Last Updated: Thursday, August 15, 2013, 15:33

विम्बल्डन चॅम्पियन फ्रान्सच्या मारियन बार्तोलीनं टेनिस करिअरला अलविदा केलाय. 28 वर्षीय बार्तोलीनं निवृत्ती घेतल्यानं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळं बार्तोलीनं निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

विम्बल्डन चॅम्पियन : अॅन्डी मरे

Last Updated: Monday, July 8, 2013, 08:05

अॅन्डी मरेने वर्ल्ड चॅम्पियन नोवाक जोकोविचचा पराभव करून पहिल्या वहिल्या विम्बल्डन जेतेपदाला गवसणी घातली.

विम्बल्डन : पहिल्याच फेरीत नदाल बाहेर!

Last Updated: Tuesday, June 25, 2013, 09:07

१२ ग्रँड स्लॅम जिंकलेला आणि नुकताच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत विजयी ठकलेला राफेल नदाल विम्बल्डन टेनिसच्या पहिल्याच फेरीत गारद झाल्यानं सर्वांनाच धक्का बसलाय.

'विम्बल्डन'वर कोण गाजवणार सत्ता?

Last Updated: Monday, June 24, 2013, 13:14

लाल मातीच्या लढाईनंतर आता विम्बल्डनच्या ग्रास कोर्टवर सीडेड टेनिसपटूंमध्ये मुकाबला रंगणार आहे.

‘स्माइल पिंकी’ उडवणार विम्बल्डन टॉस

Last Updated: Tuesday, June 18, 2013, 20:01

`स्माइल पिंकी` या नावानं ओळख मिळालेली पिंकी सोनकर थेट विम्बल्डनच्या मेन्स फायनलमध्ये टॉस उडवणार आहे. दुमडलेल्या ओठांचं व्यंग घेऊन जन्माला आलेल्या पिंकीवर स्माईल ट्रेन या संस्थेने मोफत सर्जरी केली होती.

सेरेना दी ग्रेट! पाचव्यांदा ‘विम्बल्डन’वर ताबा

Last Updated: Sunday, July 8, 2012, 07:13

पोलंडच्या तिसऱ्या मानांकित रडावान्स्कावर मात करत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सनं विम्बल्डनचं पाचव्यांदा अजिंक्यपद पटकावलंय.

मारिया बाहेर, कोण पाहणार विम्बल्डन

Last Updated: Monday, July 2, 2012, 21:42

विंम्बल्डनमध्ये मारिया शारापोव्हाला पराभवाचा धक्का बसलाय. जर्मनीच्या सबीने लिसिस्कीनं सेमीफायनलमध्ये वर्ल्ड नंबर वन मारियाचा 6-4, 6-3 असा पराभव केला. फ्रेंच ओपनचं जेतेपद पटकावल्यानंतर मारिया विम्बल्डनचा चषकही जिंकणार असंच वाटत होतं, मात्र तिचा पराभव झालायं..

विम्बल्डन: राफाएल नादालचं आव्हान संपुष्टात

Last Updated: Friday, June 29, 2012, 08:29

विम्बल्डन २०१२ मध्ये आत्तापर्यंतचा सर्वात धक्कादायक निकाल लागलाय. अकरा वेळा ग्रँड स्लॅम जिंकलेल्या राफाएल नादालचा चेकच्या लुकास रसोलने ६-७, ६-४, ६-४, २-६, ६-४ असा पराभव केलाय.

विम्बल्डनची धमाल: भूपती-बोपन्नाची कमाल

Last Updated: Thursday, June 28, 2012, 09:46

मेन्स डबल्समध्ये सातवी सीडेड महेश भूपती आणि रोहन बोपन्ना या भारतीय जोडीनं विम्बल्डन्सच्या दुसऱ्या राऊंडमध्ये दिमाखात प्रवेश केलाय.

फेडरर, जोकोव्हिच विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत

Last Updated: Thursday, June 28, 2012, 09:35

सातव्यांदा विम्बल्डन जिंकण्याच्या इराद्याने कोर्टवर उतरलेला फेडरर आणखी एक पायरी वर चढलाय. ७४ मिनिट चाललेल्या मॅचमध्ये फेडररने फॅबीयो फॉगनीनीचा ६-१, ६-३, ६-२ असा सरळ सेट्समध्ये पराभव केला.

अरे....विम्बल्डनमध्ये मिनी स्कर्टला बंदी?

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 18:42

विम्बल्डन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेचे सुमारे दीड शतकापासून आयोजन करणार्‍या ऑल इंग्लड क्लबने यंदा आपल्या कर्मचार्‍यांसाठी ‘ड्रेस कोड’ तयार केला असून, त्यामुळे आता या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महिला कर्मचार्‍यांसाठी मिनी स्कर्ट घालण्यास बंदी घालण्यात आली आहे

व्हिनसचा विम्बल्डनमधील गाशा गुंडाळला

Last Updated: Monday, June 25, 2012, 21:07

पाचवेळा विम्बल्डनचे जेतेपद पटकावणाऱ्या व्हिनस विल्यम्सवर पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढावली. रशियाच्या एलिना वेसनिनाने ३२ वर्षीय व्हिनसला ६-१ , ६-३ असे सहज नमविले. १९९७ मध्ये विम्बल्डन पदार्पण करणाऱ्या व्हिनसला पंधरा वर्षांत प्रथमच पहिल्या फेरीत गाशा गुंडाळण्याची नामुष्की सहन करावी लागली आहे.

ग्रास कोर्टवर अव्वल टेनिसपटू आमने-सामने

Last Updated: Monday, June 25, 2012, 18:06

मातीच्या कोर्टवरील लढाईनंतर आता अव्वल टेनिसपटू ग्रास कोर्टवर आमने-सामने येणार आहेत. नोव्हा जोकोविच, राफाएल नादाल आणि रॉजर फेडरर यांच्यामध्ये खर युद्ध रंगणार आहे. तर ग्लॅमरस मारिया शारापोव्हा सेंटर कोर्टचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे. भारतीय टेनिसपटूंच्या कामगिरीवरही सा-यांचच लक्ष असणार आहे.

वा...वा.. मराठी माणूस विम्बल्डनचा रेफ्री!!!

Last Updated: Saturday, June 23, 2012, 23:49

टेनिसची पंढरी मानल्या जाणा-या विम्बल्डनसह चारही ग्रँड स्लॅममध्ये गेली जवळपास 18 वर्ष नितिन कन्नमवार भारताचं प्रतिनिधित्व करताहेत. नितिन कन्नमवार हे जागतिक दर्जाचे टेनिस रेफ्री असून ते जगभरातील महत्त्वाच्या टूर्नामेंटमध्ये रेफ्रीची भूमिका चोख बजावताहेत.