Sushil Kumar in final, to contest for gold medal

सुशील कुमार फायनलमध्ये

सुशील कुमार फायनलमध्ये
www.24taas.com,लंडन


ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू सुशीलकुमारनं फायनलमध्ये धडक मारलीय. कझाकिस्तानच्या कुस्तीपटूला केलं चारीमुंड्या चित करत सुशीलनं सेमीफायनलमध्ये बाजी मारली.

सुशील कुमारने ६६ किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या कुस्तीपटूला लोळवत फायनलमध्ये ध़डक मारली आहे. सुशील आता ऑलिम्पिक गोल्डपासून केवळ एक पाऊल दूर असून सुशील ऐतिहासिक कामगिरीची नोंद करण्यास सज्ज झाला आहे. भारतीय कुस्तीपटू सुशील कुमारने क्वार्टर फायनल मॅचमध्ये उझबेकिस्तानच्या कुस्तीपटूचा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताकरता ब्राँझ मेडल जिंकणाऱ्या सुशील कुमारकडून गोल्ड मेडलची अपेक्षा सर्वांनाच आहे. खाशाबा जाधवांनंतर सुशील कुमारने तब्बल ५६वर्षांनंतर बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये भारताकरता ऑलिम्पिक मेडल मिळवलं होतं. यावेळी सुशील कुमारने ऑलिम्पिक गोल्डचा वेध घेतला तर दोन ऑलिम्पिक मेडल जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे.

सुशील कुमारनं सेमीफानलमध्ये धडक मारल्यानंतर त्याच्या घरी जोरदार जल्लोष करण्यात आला. त्याच्या घरी उत्साहाचं वातावरण आहे. त्याच्या विजयासाठी त्याच्या कुटुंबीयांसहित सारा देश प्रार्थना करत आहे. त्याचप्रमाणे त्याच्या प्रत्येक लढतीच्या वेळी ते सुशीलला चीअरही करतायत.



First Published: Sunday, August 12, 2012, 15:37


comments powered by Disqus