Last Updated: Thursday, November 24, 2011, 17:09
कौन बनेगा करोडपतीमध्ये पाच कोटी रुपये जिंकणारा पहिला स्पर्धक सुशील कुमराने रिअल्टी शो बिग बॉसची ऑफर नाकारली आहे. एण्डेमोल इंडियाने माझ्याशी संपर्क साधला आणि मला बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली पण मी नकार दिला असं सुशील म्हणाला. इतर कोणत्याही गोष्टी पेक्षा मला माझी प्रतिमा महत्वाची आहे आणि तिला तडा जाईल असं काहीही मला करायचं नाही असं सुशीलने सांगितलं.