24taas.com - Sushil Kumar, who won a silver medal for India in London Olympics

सुशीलकुमारसह योगेश्वर, मेरीचे जंगी स्वागत

सुशीलकुमारसह योगेश्वर, मेरीचे जंगी स्वागत

www.24taas.com,नवी दिल्ली

लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला सहावे मेडल मिळवून देणाऱ्या भारतीय कुस्तीपटू सुशीलकुमार याच्यासह योगेश्वर दत्तचे दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सुशीलकुमार भारावून गेला होता.

सुशील आणि योगश्वरचे सोमवारी रात्री उशीरा राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. रौप्यपदकावर आपले नाव कोरणारा सुशील आणि कांस्य पदक विजेता योगेश्वरच्या स्वागतासाठी त्यांच्या कुटुंबियांसोबत शेकडो चाहते उपस्थित होते. दोघेही पोहचात एकच जल्लोष करण्यात आला.

कांस्‍य पदक विजेती महिला बॉक्सर मेरीकोम हेचेही मायभूमीत समर्थकांनी भव्‍य स्‍वागत केले. या वेळी मेरीकॉम भावूक झाली होती. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. मेरीकोम हिला कांस्यपदक प्राप्त‍ करणारी पहिली भारतीय महिला बॉक्सर होण्याचा मान मिळाला आहे.

First Published: Tuesday, August 14, 2012, 21:26


comments powered by Disqus