थायलंड ओपनच्या फायनलमध्ये सायना - Marathi News 24taas.com

थायलंड ओपनच्या फायनलमध्ये सायना

www.24taas.com,  नवी दिल्ली 
 
ऑलिम्पिकवर लक्ष असलेल्या सायनानं आज आणखी एक विजय मिळवलाय. सायना नेहवालनं थायलंड ओपनच्या ‘बॅडमिंटन ग्रांप्री’च्या फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय. बँकॉकमध्ये सध्या सुरू असलेल्या टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये थायलंडच्या खेळाडू ‘पोर्नतीप बी’ला सानियानं मागे टाकलंय.
 
सायनानं पोर्नतीप विरुद्ध २४-२२, २१-११ नं विजय मिळवलाय. शेवटच्या मॅचमध्ये सायनाचा सामना आता थायलंडच्याच दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या रेचानोक इंथानोनबरोबर होईल. इंथानोननं चीन च्या लीन वांग ला २१-१३, २१-१९ च्या फरकानं मात दिलीय.
 
पहिल्या टप्प्यात सायनाची बरिच दमछाक झाली. थाईलंडच्या प्रतिद्वंदींनी तिच्यापेक्षा चांगला खेळ करून दाखवला. पण हार मानेल ती सायना कसली! ती शेवटपर्यंत खेळत गुण मिळवत राहीली जे शेवटच्या टप्प्यात निर्णायक ठरले. दुसऱ्या गेममद्ये पोर्नतीपला जाणवत असलेल्या थकव्याचा आणि दबावाचा सायनानं फायदा उठवला आणि तिच्यावर मात मिळवली. यंदा सायनानं स्वित्झर्लंडच्या बासेलमध्ये स्वीस ओपन ग्रांप्रीचा किताबदेखील प्राप्त केला होता.
 
.
 
 

First Published: Saturday, June 9, 2012, 16:43


comments powered by Disqus