Last Updated: Tuesday, June 26, 2012, 18:42
www.24taas.com, लंडनमिनी स्कर्टमुळे गॅमर मिळलेल्या टेनिस स्पर्धेत आता मिनी स्कर्टला बंदी घातली आहे. विम्बल्डन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेचे सुमारे दीड शतकापासून आयोजन करणार्या ऑल इंग्लड क्लबने यंदा आपल्या कर्मचार्यांसाठी ‘ड्रेस कोड’ तयार केला असून, त्यामुळे आता या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महिला कर्मचार्यांसाठी मिनी स्कर्ट घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, खेळाडूंना ही बंदी घातलण्यात आलेली नाही.
सोमवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत ऑल इंग्लड क्लबच्या सदस्यांना जिन्स, फ्लिप फ्लाप, शार्ट स्कर्ट, टी शर्ट, स्ट्रॅपलेस टॉप्स, शॉर्ट, जिपर जॅकेट, स्कफ्ड शुज, हूडिज, पंप्स व ट्रेनर या वस्तूंचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
पुरूषांनी लाउंज सूट, टेलर्ड सूट, शर्ट, टाय, ट्राऊझर व ड्रेस शूज अशा पेहरावात राहणे आवश्यक आहे. महिलांनाही ‘ड्रेस कोड’चे पालन अनिवार्य करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणार्या सदस्यांना क्लब हाऊसमध्ये प्रवेश मिळणार नाही, अशी ताकिदही देण्यात आली आहे.
First Published: Tuesday, June 26, 2012, 18:42