मारिया बाहेर, कोण पाहणार विम्बल्डन - Marathi News 24taas.com

मारिया बाहेर, कोण पाहणार विम्बल्डन

www.24taas.com, लंडन
 
विंम्बल्डनमध्ये मारिया शारापोव्हाला पराभवाचा धक्का बसलाय. जर्मनीच्या सबीने लिसिस्कीनं सेमीफायनलमध्ये वर्ल्ड नंबर वन मारियाचा 6-4, 6-3 असा पराभव केला. फ्रेंच ओपनचं जेतेपद पटकावल्यानंतर मारिया विम्बल्डनचा चषकही जिंकणार असंच वाटत होतं, मात्र तिचा पराभव झालायं...
 
रशियाच्या लिसीस्कीनं सरळ दोन सेटसमध्ये पराभव करत मारीयाचं विम्बल्डनमधल आव्हान संपुष्टात आणलयं... मागील चार ग्रँडस्लँम स्पर्धांत मारीयानं तीन स्पर्धांत फायनल गाठली होती...
 
वयाच्या 17व्या वर्षी म्हणजेचं 2004मध्ये मारीयानं पहिलं विम्बल्डनं जेतेपद पटकावलं होतं... शारापोव्हा तिच्या नैसर्गिक खेळानं नेहमीच कमबॅक करते मात्र लिसीस्किच्या धडाक्यापुढे तिचं काहिच चाललं नाही...
 

First Published: Monday, July 2, 2012, 21:42


comments powered by Disqus