बिग बीच्या हाती ऑलिम्पिकची मशाल - Marathi News 24taas.com

बिग बीच्या हाती ऑलिम्पिकची मशाल

www.24taas.com, नवी दिल्ली
 
बॉलिवूडचा महानायक बिग बी अमिताभ बच्चन लंडनमधील ऑलिम्पिक स्पर्धेत मशाल (ज्योत ) घेऊन धावणार आहे.
 
लंडनमध्ये लिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मशाल रिले स्पर्धेचे उद्या आयोजन करण्यात आले आहे. या रिलेत भाग घेण्याचा मान बिग बीला  देण्यात आला आहे.
 
याबाबतची माहिती खुद्द बिग बी अमिताभने ट्विटर या सोशल साईटवर दिली आहे. ट्विट करताना बिग म्हणतात, टी-८१६- लंडनमध्ये सकाळी दहा वाजता ऑलिम्पिक स्पर्धचे मशाल निघणार आहे. त्यासाठी मला आमंत्रित करण्यात आले आहे. त्याबद्दल मला आनंद होत आहे. हे निमंत्रण माझ्यासाठी आणि देशासाठी गर्व करणारा क्षण आहे.
 
ही ऑलिम्पिक मशाल ७० दिवसानंतर २७ जुलै रोजी लंडनमधील ऑलिम्पिक स्डेडियमवर पोहोचणार आहे.  या ज्योतीची सुरूवात ब्रिटनमधील दक्षिण-पश्चिम इंग्लड येथील कॉर्नवॉलच्या लॅंड्स एंड येथून सुरूवात झाली. ही ज्योत सूर्य किरमावरून पेटविण्यात आली आहे.

First Published: Thursday, July 26, 2012, 17:42


comments powered by Disqus