सानिया-पेस क्वार्टर फायनलमध्ये - Marathi News 24taas.com

सानिया-पेस क्वार्टर फायनलमध्ये

www.24taas.com, लंडन
 
लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा या जोडीने धुवाधार खेळी करत क्वार्टर फाईनलमध्ये प्रवेश केला आहे.या जोडीच्या कामगिरीने भारताला टेनिसमध्ये पदक मिळण्यची दाट शक्यता आहे.पेस आणि सानिया या जोडीने आपल्या पहिल्या फेरीतच भरीव कामगीरी करत सर्बियाच्या नेनाद जिमोनजिच आणि अन्ना इवानोविच यांचा ६४ मिनिटं चाललेल्या सामन्यात ६-२,६-४ असा  पराभव केला.
 
या भारतीय जोडीला सेमीफाईनलमध्ये पोहचण्यासाठी मैक्स मिर्नयी आणि व्हिक्टोरिया अजारेंका यांच्याशी सामना करावा लागणार आहे.बेलारुसच्या या जोडीने जर्मनीचे फिलिप पेटश्नर आणि एंजलिक केरबर यांचा ६-२,६-२ असा पराभव केला होता.
 
याअधी पेस आणि विष्णु वर्धन या जोडीला काल रात्री पुरुष गटात हार पत्करावी लागली होती.परंतु याआधी या जोडीने फ्रांसच्या विल्फ्रेड सोंगा आणि माईकल लोड्रा या जोडीशी मुकाबला करत ७-६,४-६,६-४ असा त्यांचा पराभव केला होता.पेस आणि सानिया या जोडीने पहिल्या सेटमधील तिस-या गेममध्ये ब्रेक पाँईट घेतला परंतु,सर्बियाई टीमने पुढच्या गेममध्ये यांची सर्व्हिस तोडून हिशोब बरोबर केला.यानंतर पेस आणि सानियाने दुस-या सेटमध्ये तुफान खेळी करत सर्बियाई जोडीला हैराण केले. पेस आणि सानियाने चांगली सर्व्हिस केल्याने सर्बियाई खेळाडुंना फक्त चार वेळाच ब्रेक पाँईट घेण्याची संधी दिली.तर भारतीय टीमला हि संधी सातवेळा मिळाली.

First Published: Friday, August 3, 2012, 13:47


comments powered by Disqus