भारतीय खेळाडूवर अन्याय, विकास जिंकूनही हारला - Marathi News 24taas.com

भारतीय खेळाडूवर अन्याय, विकास जिंकूनही हारला

www.24taas.com, लंडन
 
ऑलिम्पिक बॉक्सिंगमध्ये 69 किलो वजनीगटात विकास कृष्णनला जिंकल्यानंतरही पराभूत घोषित करण्यात आलं आहे. विकासनं 13-11 नं अमेरिकन बॉक्सरवर विजय मिळवला होता. मात्र, या निर्णयावर अमेरिकेनं आक्षेप घेतला आणि त्यामुळे ज्युरीनं आपल्या निर्णयात बदल केला. आणि अमेरिकेच्या स्पेन्सला 15-13 नं विजयी म्हणून घोषित केलं.
 
शुक्रवारी रात्री उशीरा झालेल्या या सामन्यात विकासने १३-११ असा विजय मिळविला. मात्र सामना संपल्यानंतर तासाभराने विकासला १५-११ असे पराभूत जाहीर केले. या निर्णयामुळे भारतीय गोटातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, विकासवर अन्याय झाल्याचे बोलले जात आहे.
 

या प्रकारामुळे ऑलिम्पिकचा गलथानपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. त्याचप्रमाणे भारताबरोबर पुन्हा एकदा विश्वासघात करण्यात आला आहे. या आधी बॉक्सर सुमीत सांगवानबरोबर असचा प्रकार घडला होता.

First Published: Saturday, August 4, 2012, 10:40


comments powered by Disqus