बोल्टने गोल्ड मिळवलं वेगात... - Marathi News 24taas.com

बोल्टने गोल्ड मिळवलं वेगात...

www.24taas.com, लंडन

लायटनिंग ऊसैन बोल्ट जगातला सर्वात वेगवान मानव ठरला आहे...  वाऱ्याशीही स्पर्धा करणारा ऊसैन बोल्टने पुन्हा एकदा नवा इतिहास रचला आहे. आणि आता हा विश्वविक्रम त्याने पुन्हा एकदा स्वत:चाच रेकॉर्ड मोडून रचला आहे.


.


शर्यतीचा राजा असलेल्या ऊसैन बोल्टनं ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास रचला आहे. १०० मीटर रेस जिंकत बोल्टनं गोल्ड मेडल पटकावलं आहे. ९.६३ सेकंदात ही रेस त्यांनं पूर्ण केली आहे. ऑलिम्पिकमध्ये बोल्टनं हा नवा रेकॉर्ड केला आहे.


.


या रेसमध्ये योहान ब्लॅक दुसऱ्या तर जस्टिन गेटलिन तिसऱ्या स्थानावर राहिले. त्यामुळे बोल्टने आपली मक्तेदारी पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. त्याला नेहमीच स्वत:चं आव्हान राहिले आहे.






First Published: Monday, August 6, 2012, 10:18


comments powered by Disqus