Last Updated: Tuesday, August 7, 2012, 12:10
www.24taas.com, नवी दिल्लीलंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला ब्राँझ मेडलची कमाई करून मायदेशी परतलेल्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे दिल्ली एअरपोर्टवर जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
सायना लंडनहून आज सकाळी दिल्लीत दाखल झाली. यावेळी तिचे दिल्लीत क्रीडाप्रेमींकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. सायनाच्या चेहऱ्यावरदेखील यावेळी विजयाचा आनंद झळकत होता. लंडन ऑलिम्पिक 2012मध्ये सायनाने बॅडमिंटनमध्ये भारताला ब्राँझ मेडल मिळवून दिलंय. यावेळी तिचे कोच पी. गोपीचंददेखील तिच्यासोबत होते.
First Published: Tuesday, August 7, 2012, 12:10