सायना म्हणाली, मला नको दीड करोड... - Marathi News 24taas.com

सायना म्हणाली, मला नको दीड करोड...

www.24taas.com, नवी दिल्ली
 
‘शटल क्वीन’ सायना नेहवालने लंडनला ब्रॉंँझ पदक पटकावले. पण यासाठी सायनाच्या अथक परिश्रमांचा मोठा वाटा आहे. पण या खेळांच्या कुंभमेळ्याची तयारी करण्यात अडथळा नको म्हणून सायनाने तब्बल दीड कोटी रुपयांच्या जाहिरातीवर पाणी सोडले.
 
मागील सत्रात सलग विजय मिळवणार्‍या सायना नेहवालची देशातील लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. हे लक्षात घेऊन सायनाकडे जाहिरातींसाठी बर्‍याच आंतरराष्ट्रीय कंपन्या लाखो रुपये घेऊन आल्या होत्या. आपल्या ऑलिम्पिकच्या ध्येयापासून जराही न ढळणार्‍या सायनाने तब्बल दीड कोटी रुपयांच्या जाहिरातींवर पाणी सोडले. सायना पदक जिंकणार याचा विश्‍वास या कंपन्यांना होता. म्हणूनच त्यांनी सायनाला ऑलिम्पिकपूर्वीच आपल्या जाहिराती करण्यासाठी गळ घातली.
 
या जाहिरातींच्या शूटिंगसाठी सायनाला कोर्टपासून ८-८ तास लांब राहावे लागले असते. पण सायनाने प्रत्येक क्षण बॅडमिंटनलाच देण्याचे ठरवल्याने ती विजेती ठरली असल्याची माहिती सायनाचे वडील डॉ. हरविंदरसिंग नेहवाल यांनी दिली. एवढेच नाही तर मन विचलित होऊ नये म्हणून सायनाने प्रसारमाध्यमांना बोलणेदेखील टाळले होते.
 
 

First Published: Wednesday, August 8, 2012, 04:27


comments powered by Disqus