चेन्नई दुहेरीत लिएँडर पेसच भारी - Marathi News 24taas.com

चेन्नई दुहेरीत लिएँडर पेसच भारी

www.24taas.com, चेन्नई
 
भारतीय टेनिस प्लेअर लिएँडर पेसने सर्बियन पार्टनर यान्को टिप्सारविचच्या साथीत एअरसेल चेन्नई ओपनच्या मेन्स डबल्स फायनलमध्ये थर्ड सीडेड इस्रायली जोडी ऍन्डी रॅम आणि जोनाथन एर्लीचचा पराभव करत जेतेपद मिळवलं आहे.
 
पेस-टिप्सारविच जोडीने रॅम-एर्लीच जोडीचा ६-४, ६-४ अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. भारतीय-सर्बियन जोडीचं हे पहिलंच एटीपी जेतेपद होतं. तर पेसचं डबल्समधील सहावं जेतेपद ठरलं आहे.
 
३८ वर्षीय पेसचं हे ४८वं दुहेरी आणि एकूण ४९वं एटीपी विजेतेपद आहे. शिवाय त्याने पेसने एटीपी चेन्नई ओपन दुहेरीचं विजेतेपद सलग दुसऱ्यांदा पटकावलं आहे. तर तिप्सारेविकचं हे पहिलं दुहेरी जेतेपद असून तिसरं एटीपी विजेतेपद आहे.

First Published: Monday, January 9, 2012, 18:03


comments powered by Disqus