हॉकी टीममध्ये आलीय नवी जान - Marathi News 24taas.com

हॉकी टीममध्ये आलीय नवी जान

www.24taas.com, नवी दिल्ली
 
दिल्लीमध्ये सुरु असलेल्या ऑलिंपिक क्वालिफायरच्या फायनलमध्ये भारताचं स्थान जवळपास निश्चित झालं आहे. कॅनडाविरुद्धच्या रंगतदार लढतीमध्ये भारतानं ३-२ नं बाजी मारली. या विजयासाही भारतानं टुर्नामेंटमध्ये सलग चौथ्या विजयाची नोंद केली. २००८ बीजींग ऑलिंपिकमध्ये २८ वर्षानंतर भारताला हॉकीमध्ये क्वालिफाय करता आलं नव्हतं. क्वालिफायरमध्ये विजय मिळवता आला नसल्यानं, ऑलिंपिकमध्ये मेडल पटकावण्याच भारताचं  स्वप्न स्वप्नच राहिलं होतं.
 
या मानहानिकारक पराभवामुळेच भारताला हॉकीचा सर्वात खराब काळ यानिमित्तानं पाहावा लागला होता. आता, २०१२च्या लंडन ऑलिंम्पिकसाठी क्वालिफाय करण्याचं आव्हान भारतीय हॉकी टीमसमोर आहे. दिल्लीमध्ये सुरु असलेल्या क्वालिफाईंग टुर्नामेंटमध्ये भारतानं सलग चार विजय मिळवले आहेत. या विजयामुळे भारताचा क्वालिफायर टुर्नामेंटच्या फायनलचा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. पोलंडविरुद्धच्या पुढच्या मॅचमध्ये पराभव सहन करावा लागला तरी, भारताच्या फायनलच्या आशा या कायम राहणार आहेत.
 
टुर्नामेंटमध्ये चार विजय मिळवत भारताचे १२ पॉईंट्स झाले आहेत. तसंच, गोल फरकाच्या आधारवर पूलमध्ये भारत अव्वल स्थानी कायम राहणार हे निश्चित झालं आहे. भारतीय हॉकी टीमनं टुर्नामेंटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. आता, फायनल गाठत टुर्नामेंट जिंकण्याच्या उद्देशानचं भारतीय टीम मैदानावर उतरणार हे नक्की. ऑलिंपिक क्वालिफायर टुर्नामेंटमध्ये विजय मिळवल्यास भारत लंडन ऑलिपिकसाठी क्वालिफाय होणार आहे.
 
 
 
 

First Published: Thursday, February 23, 2012, 16:24


comments powered by Disqus